मुंबई

Rohit Pawar : प्रफुल्ल पटेलांच्या भेटीवर रोहित पवारांची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, “शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करायला आले असतील तर…”

•रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतल्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर आमदार रोहित पवारांचे स्पष्ट भाष्य; राजकीय चर्चांवरही दिले उत्तर

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात उपचार घेत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधान आले असून, महायुतीमधील प्रवेशाच्या वाऱ्यांबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. या संपूर्ण घडामोडींवर शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“तब्येतीची विचारपूस करायला आल्यास गैर काय?” – रोहित पवार

माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी या भेटीवर फारसे राजकारण न करण्याचे संकेत दिले. ते म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयात आहेत. अशा वेळी जर कोणी राजकीय विरोधक किंवा इतर पक्षातील नेते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येत असतील, तर त्यात काही गैर नाही. माणुसकीच्या नात्याने साहेबांची भेट घेणे यात वेगळा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात घडत असलेल्या घडामोडींमुळे विविध चर्चांना उधाण आले असले, तरी ही भेट पूर्णपणे सदिच्छा भेट आणि प्रकृतीची चौकशी करण्यासाठीच होती, असे संकेत रोहित पवार यांच्या वक्तिवरून मिळाले आहेत. दरम्यान, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा सक्रिय राजकारणात परततील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button