पुणेपिंपरी चिंचवड

Pune News : थेरगावात एमडी विक्री प्रकरणी दोघांना अटक; काळेवाडी पोलिसांची कारवाई

Pune News :पिंपरी, महाराष्ट्र मिरर : बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोन तरुणांना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (४ नोव्हेंबर) पहाटे सव्वाएक वाजता थेरगाव गावठाण ते थेरगाव स्मशानभूमी जाणारे रोडवर, थेरगाव येथे करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रणव सुधाकर गायकवाड (२०, रहाटणी) आणि अंश अमित चव्हाण (१९, रहाटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल अतिक शेख यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
थेरगाव गावठाण येथून थेरगाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघेजण एमडी हा अमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची माहिती काळेवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १०.२१ ग्रॅम वजनाचे एक लाख ४५ हजार २१० रुपये किमतीचा एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button