पुणेक्राईम न्यूजपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

Pune News : माजी उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे यांच्यावर पालिकेच्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगाचा आरोप; पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी

Pune News : पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने माजी उपमहापौर मुकारी अण्णाalgude यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे. कार्यालयात एकटी असल्याचे पाहून मुकारी अण्णा यांनी अयोग्य वर्तन करत अनुचित वक्तव्य केल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. ६ नोव्हेंबर रोजी हे तक्रार अर्ज नगरसचिव कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले असून, याच्या प्रती महापौर आणि महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या (विशाखा समिती) अध्यक्षांकडेही सादर करण्यात आल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

तक्रारदार महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (५ नोव्हेंबर) महापालिकेत स्थायी समितीची बैठक सुरू होती. या बैठकीमुळे नगरसचिव कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. याच वेळी कार्यालयात कर्मचारी महिला एकटी असल्याचे पाहून मुकारी अण्णा अलगुडे तेथे आले. त्यांनी तिच्याशी असभ्य आणि अयोग्य वर्तन करत आक्षेपार्ह टिप्पणी केली.https://maharashtramirror.com/ Pune News

या अचानक घडलेल्या प्रकारामुळे धक्का बसलेल्या महिला कर्मचाऱ्याने तत्काळ नगरसचिवांकडे धाव घेत या संपूर्ण घटनेची माहिती दिली. नगरसचिवांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले असता, पीडित महिलेने केलेल्या दाव्याला स्पष्ट पुष्टी मिळाल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे मानसिक धक्का बसला असून, कार्यालयात काम करण्याची भीती वाटत असल्याचे पीडितेने म्हटले आहे. या गंभीर प्रकरणानंतर महिला कर्मचाऱ्याने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत: मुकारी अण्णा अलगुडे यांच्याविरोधात तातडीने कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी व पोलीस गुन्हा दाखल करावा. माजी पदाधिकाऱ्याचा नगरसचिव कार्यालयात सातत्याने वावर कोणाच्या परवानगीने आणि कशासाठी असतो, याची सखोल चौकशी व्हावी. महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात काम करता यावे, यासाठी संबंधित माजी उपमहापौरांना महापालिका मुख्य इमारतीमध्ये प्रवेश देण्यास तत्काळ बंदी घालावी.
महापालिकेच्या सुरक्षेचा आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीतील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नगरसचिव कार्यालयात असा प्रकार घडल्याने महापालिका वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती यावर काय पाऊल उचलते आणि महापालिका प्रशासन पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button