पुणेक्राईम न्यूजपिंपरी चिंचवड

Kohlapur News : इचलकरंजीतील ज्योतिषी मंदार रानडे हत्या प्रकरणाचा उलगडा; वैयक्तिक सूडातून खून केल्याचा संशय

Kohlapur News :कोल्हापूर : इचलकरंजी येथील प्रसिद्ध पुरोहित व ज्योतिषी मंदार अजित रानडे (वय ३५) यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा कर्नाटकातील सदलगा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मानकापूर शिवारात उसाच्या शेतात ३१ ऑक्टोबर रोजी त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी बाबूसाहेब उर्फ दीपक अण्णा मगदूम (वय ४५, रा. शिरदवाड) याला ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासानुसार, वैयक्तिक सूडाच्या भावनेतून पूर्वनियोजित कट रचून ही हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News

मिरचीपूड फेकून केला हल्ला; धारदार शस्त्राने वार
इचलकरंजीतील गुजरी पेठ आणि टिळक रोड परिसरात राहणारे मंदार रानडे हे पौरोहित्य आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपला व्यवसाय करत होते. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मानकापूर गावच्या हद्दीतील तेरदाळे यांच्या उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलांना त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला..https://maharashtramirror.com/ Kohlapur News

हल्लेखोराने प्रथम रानडे यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून त्यांना असहाय्य केले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर आणि मानेवर वार करून त्यांची हत्या केली. हल्ल्याची पद्धत आणि घटनास्थळी आढळलेली परिस्थिती पाहता हा प्रकार नियोजनपूर्वक करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.

वैयक्तिक सूडातून हत्या केल्याचा संशय
घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी विविध बाजूंनी तपासाची चक्रे फिरवत संशयित बाबूसाहेब उर्फ दीपक मगदूम याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. वैयक्तिक वैमनस्य आणि सूडभावनेतून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मोठी खळबळ उडाली आहे. एका परिचित पुरोहित आणि ज्योतिषाची अशा प्रकारे हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येमागील नेमके कारण, कटातील अन्य सहभाग आणि आरोपीने हत्येचे नियोजन कसे केले, याबाबतचा पुढील तपास सदलगा पोलीस करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button