मुंबईठाणेपिंपरी चिंचवडपुणे

Mumbai News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईकरांना लोकलचा फटका! मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, अनेक फेऱ्या रद्द; पश्चिम रेल्वेला दिलासा

Mumbai News :मुंबई : दिवाळीच्या सणाचा उत्साह सुरू असतानाच मुंबईकर प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, रविवारी (८ नोव्हेंबर) मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि दुरुस्ती कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल ते वाशी या मार्गांवर हा ब्लॉक लागू राहणार असल्याने प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळणार असून, या मार्गावर कोणताही मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलेला नाही.https://maharashtramirror.com/ Mumbai news

माटुंगा ते मुलुंडदरम्यान मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून, काही गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे.

पनवेल ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरही ब्लॉक

ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ या वेळेत ब्लॉक असेल. यामुळे ठाणे ते पनवेल तसेच सीएसएमटी ते पनवेल आणि बेलापूरदरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द राहतील.त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button