मुंबईठाणेपिंपरी चिंचवडपुणे

Mumbai news : शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा; आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Mumbai news : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

नेमकं काय घडलं?

शरद पवार यांनी सुरुवातीला पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतले होते. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. मात्र, मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना खोकला, श्वास घेण्यास त्रास तसेच छातीत कफ साचल्याचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती.https://maharashtramirror.com/ Mumbai news

दरम्यान, डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, पुढील वैद्यकीय तपासणीनंतरच डिस्चार्जबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

अनेक दिग्गज नेत्यांनी घेतली भेट

शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, विश्वजीत कदम आणि खासदार संजय राऊत यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनीही त्यांची भेट घेतली. आता शरद पवार यांना आज डिस्चार्ज मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळासह त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button