Sunetra Pawar: ‘आम्ही एनडीएसोबत, डिलिमिटेशनला आमचा पाठिंबा’
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केली भूमिका
1 मिनिट वाचन

Sunetra Pawar: बारामती, महाराष्ट्र मिरर : आम्ही एनडीएसोबत आहोत. त्यामुळे डिलिमिटेशनला आमचे समर्थनच आहे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मांडली.
सुनेत्रा पवार सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांना डिलिमिटेशनबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी एनडीएसोबत असल्याने या मुद्द्याला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही चर्चा सुरू आहे. २७ नोव्हेंबर रोजी जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभेच्या जागांमध्ये प्रत्येक राज्यात समान ५० टक्के वाढ करण्याची अट ठेवून विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाचा मसुदा पाहिल्यानंतरच पक्षाची अंतिम भूमिका ठरेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भूमिकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांच्या विधानामुळे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सत्ताधारी एनडीएमधील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली आहे.

महाराष्ट्र मिरर




