मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Mallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोपMumbai News : कामाठीपुरा पुनर्विकासाला सर्वपक्षीय नेत्यांचा हिरवा कंदील! राजकारण बाजूला ठेवून प्रकल्पाला गती देण्याचा निर्धारVijay Wadettiwar‘पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा’; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघातडिलिमिटेशन विधेयकावरून मविआत वादाची ठिणगी; काँग्रेसचा शरद पवारांना सवाल, भाजपचाही बोचरा टोला!politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावा

Raj Thackeray: ‘पवारांची पहिली टीम सत्तेत गेली, दुसरीही सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईल’

राज ठाकरेंची तीन वर्षांपूर्वीची भविष्यवाणी चर्चेत

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Raj Thackeray: मुंबई, महाराष्ट्र मिरर : डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या संभाव्य भूमिकेवरून राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे २ जुलै २०२३ रोजीचे जुने ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाची सध्याच्या राजकीय घडामोडींशी सांगड घातली जात आहे.

“पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!” असे भाकीत राज ठाकरे यांनी त्या वेळी केले होते. डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या संभाव्य भूमिकेची चर्चा सुरू झाल्याने या विधानाची सोशल मीडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे.

काय होते राज ठाकरेंचे २०२३ मधील विधान?

२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट महायुती सरकारमध्ये सहभागी झाला होता. या घडामोडीनंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले होते. “आज महाराष्ट्राचा ‘सिंहासन’ सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला,” असे म्हणत त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर टीका केली होती.

“उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

भाजपच्या रणनीतीवरही केले होते भाष्य

या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्या जाणाऱ्या महत्त्वावरून भाजपवरही टीका केली होती. “महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिले जाणारे (अवास्तव) महत्त्व रुचत नव्हते, त्यावर अनायसे उतारा शोधला,” असे त्यांनी नमूद केले होते.

महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करताना राज ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणाचा स्तर घसरत असल्याची टीका केली होती. “ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर