मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Mallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोपMumbai News : कामाठीपुरा पुनर्विकासाला सर्वपक्षीय नेत्यांचा हिरवा कंदील! राजकारण बाजूला ठेवून प्रकल्पाला गती देण्याचा निर्धारVijay Wadettiwar‘पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा’; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघातडिलिमिटेशन विधेयकावरून मविआत वादाची ठिणगी; काँग्रेसचा शरद पवारांना सवाल, भाजपचाही बोचरा टोला!politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावा

Pune News : दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तिमय वातावरणात काकड आरती; १४ वीरनारींचा सन्मान

Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पंचमीच्या निमित्ताने शनिवारी (२८ नोव्हेंबर) पहाटे भक्तिमय वातावरणात काकड आरतीचे आयोजन करण्यात आले

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तिमय वातावरणात काकड आरती; १४ वीरनारींचा  सन्मान
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पंचमीच्या निमित्ताने शनिवारी (२८ नोव्हेंबर) पहाटे भक्तिमय वातावरणात काकड आरतीचे आयोजन करण्यात आले

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पंचमीच्या निमित्ताने शनिवारी (२८ नोव्हेंबर) पहाटे भक्तिमय वातावरणात काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वारकरी मंडळ, पुणे यांच्या विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या धार्मिक परंपरेचे आयोजन करण्यात आले. पहाटे पाच वाजता काकड आरतीला सुरुवात झाली. सुमारे तीन तास सुरू असलेली ही आरती सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास संपन्न झाली. यावेळी मंदिरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव परंपरेनुसार उत्साहात साजरे केले जातात. त्याच परंपरेचा भाग म्हणून पंचमीच्या दिवशी काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी (दि.२८) सकाळी साडेदहा वाजता मराठा बटालियनमधील शहीद जवानांच्या १४ वीरनारींचा सन्मान करण्यात आला. या वीरनारी म्हणजेच शहीद जवानांच्या पत्नींना प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि साडी-चोळी देऊन गौरविण्यात आले. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम आहे.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper