मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Mallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोपMumbai News : कामाठीपुरा पुनर्विकासाला सर्वपक्षीय नेत्यांचा हिरवा कंदील! राजकारण बाजूला ठेवून प्रकल्पाला गती देण्याचा निर्धारVijay Wadettiwar‘पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा’; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघातडिलिमिटेशन विधेयकावरून मविआत वादाची ठिणगी; काँग्रेसचा शरद पवारांना सवाल, भाजपचाही बोचरा टोला!politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावा

House: सरकारी जमिनीवरील जुन्या घरांना कायदेशीर मान्यता

फडणवीस सरकारच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला वेग - ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे विनामूल्य

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

जुने घर

House:मुंबई, महाराष्ट्र मिरर : राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने वेग दिला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कामासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा समित्यांवर ११५ सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पात्र कुटुंबांच्या अतिक्रमण नियमितीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

महसूल व वन विभागाने २५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, १ जानेवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेली आणि सध्या केवळ निवासी वापरात असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे विशिष्ट अटींवर नियमित केली जाणार आहेत. या योजनेत ५०० चौरस फुटांपर्यंतचे निवासी अतिक्रमण विनामूल्य नियमित होईल. ५०० चौरस फुटांपेक्षा अधिक आणि कमाल १,५०० चौरस फुटांपर्यंतच्या क्षेत्रासाठी पहिल्या ५०० चौरस फुटांवर शुल्क आकारले जाणार नाही; त्यापुढील क्षेत्रासाठी प्रचलित बाजारमूल्याच्या १० टक्के रक्कम भरावी लागेल.

प्रत्येक कुटुंबाला एकाच घराचा लाभ

या योजनेचा लाभ एका कुटुंबाला संपूर्ण महाराष्ट्रात केवळ एकाच अतिक्रमणासाठी मिळणार आहे. पात्रतेसाठी १ जानेवारी २०२१ रोजी संबंधित घर अस्तित्वात असल्याचा पुरावा आवश्यक आहे. मतदार यादीतील नाव, वीजबिल, मालमत्ता कराची पावती किंवा इतर शासकीय कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातील. त्यासोबत मागील एक वर्षाचा रहिवास पुरावाही द्यावा लागेल. अर्जासोबत स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे.

३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

पात्र लाभार्थ्यांना नियमितीकरणासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज संबंधित महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कार्यालयात स्वीकारले जातील. अर्ज आणि कागदपत्रांची छाननी केल्यानंतर सक्षम प्राधिकारी निर्णय घेतील. पात्र अर्जदारांना नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अतिक्रमण हटवण्यापासून संरक्षण मिळणार आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर