मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Vijay Wadettiwar‘पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा’; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघातडिलिमिटेशन विधेयकावरून मविआत वादाची ठिणगी; काँग्रेसचा शरद पवारांना सवाल, भाजपचाही बोचरा टोला!politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासा

Vijay Wadettiwar‘पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा’; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघात

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांची नाराजी

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

Senior leader Vijay Wadettiwar
Senior leader Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwarमुंबई : मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, इंडिया आघाडीच्या बैठकीलाही पवार गटातील कोणताही नेता उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वडेट्टीवार म्हणाले की, पवारांनी संपूर्ण आयुष्य पुरोगामी विचारांचा पुरस्कार करण्यात घालवले. मात्र, आता त्यांच्याकडून जातीवादी आणि धर्मांध शक्तींशी हातमिळवणी केली जात असल्याचे दिसत आहे. अशा शक्तींसोबत ते जातील, असे कधी वाटले नव्हते. मात्र, पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा राहिला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. हा पक्ष केवळ सत्तेसाठीच स्थापन झाला असून, सत्तेशिवाय त्यांना राहता येत नाही. या पक्षाला कोणताही वैचारिक आधार उरलेला नाही, असे ते म्हणाले. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पाठिंबा दिला होता. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार पवारांच्या माध्यमातून पुढे जातील, या अपेक्षेने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यांनीच त्या विचारांना संपवण्याचे काम केल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

डिलिमिटेशन विधेयकाच्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, या विधेयकामुळे भविष्यात संविधान आणि लोकशाही धोक्यात येऊ शकते. देशातील निवडणूक प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशात हुकूमशाही आणण्याच्या उद्देशानेच हे विधेयक आणले जात असल्याचे आमचे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही वडेट्टीवार यांनी टीका केली. सुप्रिया सुळे यांना सत्तेत सहभागी व्हायचे असून मंत्रीपदाची अपेक्षा असल्याचा दावा त्यांनी केला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हा निर्णय एकत्रितपणे घेतला असावा. हा निर्णय केवळ एका व्यक्तीचा नसून दोघांनी मिळून घेतलेला आहे, असे मला वाटते, असे वडेट्टीवार म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवरही भाष्य केले. केवळ दहा आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रिपदाची मागणी करणे हास्यास्पद आहे, असे ते म्हणाले. भाजपने ६० आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद दिले नव्हते. मात्र, डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात भाजप सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करणार असेल, तर आम्हाला आनंदच आहे, असा उपरोधिक टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर