CBT: MPSC परीक्षा रोहित पवार आक्रमक
CBT : पुणे राज्यसेवा आयोगाने लागू केलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकार आणि आयोगावर टीका केली आहे.
2 मिनिट वाचन

CBT: CBT परीक्षा पद्धतीवरून रोहित पवार आक्रमक; विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा
CBT : पुणे राज्यसेवा आयोगाने लागू केलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकार आणि आयोगावर टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा येत्या आठ ते दहा दिवसांत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आपण स्वतः विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.( CBT )

Crime News : दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद, २० गुन्हे उघड
रोहित पवार यांनी सामाजिक माध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यसेवा आयोगाने विद्यार्थ्यांवर मनमानीपणे ऑनलाईन परीक्षा पद्धत लादली असून, त्याविरोधात राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून वारंवार विरोध नोंदवला, निवेदने दिली आणि सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, आयोगाने त्यांच्या भावना आणि मागण्यांची दखल घेतलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

सरकारने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करत रोहित पवार यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. जर येत्या आठ ते दहा दिवसांत सरकार आणि आयोगाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशा परिस्थितीत आपण स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात सहभागी होऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

CBT परीक्षा पद्धतीबाबत राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून विविध आक्षेप नोंदवले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाधारित परीक्षेमुळे होणाऱ्या अडचणी, परीक्षा केंद्रांची उपलब्धता, तांत्रिक अडथळे आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या सर्व मुद्द्यांवर आयोगाने विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणीही विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे.( CBT )
Maharera : बिल्डर नागपाल यांना दणका: १ कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, "शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला; आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी," असे म्हणत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.
दरम्यान, रोहित पवार यांच्या भूमिकेनंतर राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये या विषयावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सरकार आणि राज्यसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेतली, तसेच CBT परीक्षा पद्धतीबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी सरकार किंवा राज्यसेवा आयोगाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही .
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)




