मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Crime News : दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद, २० गुन्हे उघड

Crime News : पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा जणांना अटक केली आहे.

DO
Dhanshree Otari

2 मिनिट वाचन

crime news

Crime News : पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

Crime News : पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे, चोरीची बोलेरो जीप आणि इतर साहित्य असा एकूण १४ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील २० गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे. (crime news police arrest interstate gang )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप (एमएच-१७ एजे-३०७५) १२ जुलै रोजी सकाळी कोळवाडी (ता. जुन्नर) येथे दिसून आली. वाहनाचा शोध घेत असलेल्या वाहनमालकाच्या नातेवाईकांनी संशयितांना विचारणा केली असता वाद झाला. त्यावेळी "चोर-चोर" अशी आरडाओरड होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोन आरोपींना पकडले, तर इतर चार आरोपी डोंगराच्या दिशेने पसार झाले.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Pmc Politics : भाजप-राष्ट्रवादी युतीची दाट शक्यता

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी आणि कडगोरे परिसरातील डोंगर-दऱ्यांमध्ये तब्बल सहा तास शोधमोहीम राबवून उर्वरित चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. ( Crime News )

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सोनूकसग कपूरकसग टाक, पिलूकसग शेरकसग दुधानी, करणकसग गगनकसग टाक, पंकजकसग काळुकसग शिकलगार उर्फ दुधानी, पापीकसग उर्फ कृष्णकसग टाक आणि मंगलकसग मायाकसग दुधानी यांचा समावेश आहे.

Moshi Garbage Depot : एएलआर कंपनीच्या प्रोजेक्ट हेड आणि सेफ्टी ऑफिसरला अटक

चौकशीत या टोळीने महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरी असे एकूण २० गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यामध्ये २ दरोडे, १ दरोड्याचा प्रयत्न, २ जबरी चोरी, १३ घरफोडी आणि २ वाहन चोरीचे गुन्हे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याशिवाय या आरोपींवर यापूर्वीही विविध राज्यांत ५० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ( Crime News )

या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीस स्टेशनचे पथक करत आहे.

Maharera : बिल्डर नागपाल यांना दणका: १ कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, ओतूर पोलीस स्टेशन तसेच जुन्नर विभागातील पोलिसांनी केली. आरोपींच्या शोधासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी आणि कडगोरे येथील ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनीही मोलाचे सहकार्य केले. ( Crime News )

शेअर करा