मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

• अनौपचारिक गप्पांमधील वक्तव्याने निर्माण केला सस्पेन्स; गोकुळ दूध संघ आणि राजकीय घडामोडींवरही स्पष्ट भाष्य

V
Vivek

2 मिनिट वाचन

Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

• अनौपचारिक गप्पांमधील वक्तव्याने निर्माण केला सस्पेन्स; गोकुळ दूध संघ आणि राजकीय घडामोडींवरही स्पष्ट भाष्य

मबई:- महाराष्ट्राच्या राजकारणात दिवाळीच्या सणासुदीत एकामागून एक नवीन राजकीय घडामोडी आणि विधानांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार व अनौपचारिक गप्पांच्या ओघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत एक मोठे विधान केले आहे. 2014 ते 2019 मधील युती सरकारच्या काळाची आठवण काढत, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्यामुळे माझा अनुभव अधिक समृद्ध आणि मोठा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अचानक एकच सस्पेन्स निर्माण झाला असून, यामागील नेमका रोख कशावर आहे याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

"संकटांचा सामना करण्याची जुनी सवय, उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याचा अनुभव चांगला राहिला"

अनौपचारिक चर्चेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना शिंदे गट आणि जुन्या शिवसेना नेतृत्वासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी 2014 ते 2019 मधील सरकारमधील आव्हाने, दुष्काळ आणि इतर कठीण परिस्थितीचा उल्लेख केला. त्या काळात अनेक अडचणी आल्या असल्या तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला आणि मोठा राहिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया एकप्रकारे कौतुक आहे की राजकीय टोला, यावर आता तर्क-वितर्क लढवले जात असले तरी, या वक्तव्याने राजकीय पटलावर एक नवी चर्चा नक्कीच निर्माण केली आहे.

सतेज पाटील आणि मुश्रीफांनी एकत्र निर्णय घेतला असता तर शासन संचालकांची गरज भासली नसती

याच अनौपचारिक चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ प्रकरणावरही अत्यंत परखड भूमिका मांडली. गोकुळच्या अध्यक्षनिवडीत निर्माण झालेला वैधानिक पेच आणि कोरमचा प्रश्न सोडवण्यासाठीच सरकारला हस्तक्षेप करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी आपापसात मिळून योग्य तो निर्णय घेतला असता, तर शासनाला चार संचालक नेमण्याची वेळच आली नसती, असे सांगत त्यांनी या प्रकरणात काँग्रेसने राजकारण आणल्याचा आरोप केला. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांना गोकुळमध्ये संधी देण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणात सरकार पूर्णपणे संस्थेच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

हेही वाचा: मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट

शेअर करा