मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Vijay Wadettiwar‘पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा’; विजय वडेट्टीवारांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर घणाघातडिलिमिटेशन विधेयकावरून मविआत वादाची ठिणगी; काँग्रेसचा शरद पवारांना सवाल, भाजपचाही बोचरा टोला!politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासा

Mental Health: मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात

एकाग्रता, झोप आणि नातेसंबंधांवर परिणाम

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

मोबाईल

स्मिता कुलकर्णी

Mental Health पुणे,महाराष्ट्र मिरर : डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे मानवी मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, एकाग्रतेचा अभाव, मानसिक थकवा, चिडचिड, झोपेच्या समस्या आणि नातेसंबंधांमधील दुरावा वाढत असल्याचे निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञांनी नोंदवले आहे. विशेषतः स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्सच्या आहारी गेल्यामुळे तरुण आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यापुढे नवी आव्हाने निर्माण होत आहेत, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जगताप यांनी सांगितले.

स्मार्टफोन हे आता केवळ संवादाचे साधन राहिले नसून मनोरंजन, शिक्षण, आर्थिक व्यवहार आणि सामाजिक संपर्काचे प्रमुख माध्यम बनले आहे. मात्र, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील लाइक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्स यांच्या आधारे स्वतःचे मूल्य ठरवण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास निराशा, न्यूनगंड आणि चिंता निर्माण होऊ शकते. याचा किशोरवयीन मुलांच्या आत्मविश्वासावरही परिणाम होत असल्याचे डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.

मोबाईलवरील सततच्या नोटिफिकेशन्स आणि रील्स पाहण्याच्या सवयीमुळे मेंदू सतत सतर्क अवस्थेत राहतो. त्यामुळे दीर्घकाळ एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. रात्री उशिरापर्यंत स्क्रीनचा वापर केल्याने झोपेच्या चक्रावर परिणाम होऊन दिवसभर थकवा आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. तसेच कुटुंबीयांसोबत असूनही मोबाईलमध्ये गुंतून राहिल्याने प्रत्यक्ष संवाद कमी होऊन नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.

या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईलपासून दूर राहणे, जेवताना फोन बाजूला ठेवणे, कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संवाद साधणे आणि मैदानी खेळांना वेळ देणे आवश्यक आहे. मोबाईल वापरावर आपले नियंत्रण असावे, मोबाईलचे आपल्यावर नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असे आवाहन डॉ. संदीप जगताप यांनी केले.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर