मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर आता ‘हाय साखर, हाय मीठ, हाय फॅट’चे लेबल बंधनकारक होणारपुण्यात बेकायदा बाईक टॅक्सीविरोधात आरटीओची धडक मोहीम; ११ वाहने जप्तभारतीय संविधान दिन उत्साहात साजरा ; पुणे महानगर परिवहन महामंडळाचा उपक्रमनिवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून भाजप-काँग्रेसमध्ये वाद; केंद्र सरकारच्या प्रक्रियेचे भाजपकडून समर्थनसंविधान गौरव दिनानिमित्त भाजपचे देशभर विविध कार्यक्रम; अमित शाह, जे. पी. नड्डा यांचे मार्गदर्शनगोकुळच्या सत्ता संघर्षावर ३ डिसेंबरला पुन्हा सुनावणी

पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर आता ‘हाय साखर, हाय मीठ, हाय फॅट’चे लेबल बंधनकारक होणार

सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला नियम तयार करण्याचे निर्देश; पॅकेटच्या दर्शनी भागावर स्पष्ट चेतावणी द्यावी लागणार

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

पॅकेज केलेले खाद्यपदार्थ
पॅकेज केलेले खाद्यपदार्थ

नवी दिल्ली : पॅकेज केलेले खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांना त्यातील मीठ, साखर आणि संतृप्त चरबीचे (सॅच्युरेटेड फॅट) अधिक प्रमाण सहज ओळखता यावे, यासाठी आता पॅकेटवरच स्पष्ट चेतावणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (FSSAI) आवश्यक नियम तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे भविष्यात खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगवर ‘हाय फॅट’, ‘हाय शुगर’ आणि ‘हाय सॉल्ट’ असे इशारे दिसण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले. खाद्यपदार्थांमधील केवळ अतिरिक्त साखर किंवा चरबीच नव्हे, तर एकूण साखर आणि संतृप्त चरबीचे प्रमाणही विचारात घेतले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यासाठी मीठ, एकूण साखर आणि संतृप्त चरबीच्या कमाल मर्यादा नव्याने निश्चित करण्याची गरजही व्यक्त केली.

न्यायालयाच्या निर्देशानुसार, खाद्यपदार्थांच्या पॅकेटच्या दर्शनी भागावर तीन स्वतंत्र षटकोनी चेतावणी चिन्हे असावीत. त्यावर ‘हाय फॅट’, ‘हाय शुगर’ आणि ‘हाय सॉल्ट’ असे स्पष्टपणे नमूद करावे. प्रत्येक चिन्हाने पॅकेजच्या मुख्य दर्शनी भागातील किमान ४ ते ५ टक्के जागा व्यापली पाहिजे. तसेच, त्यावरील मजकूर मोठ्या आणि सहज वाचता येणाऱ्या अक्षरांत असावा.

मात्र, या चेतावणीसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या मर्यादा योग्य असाव्यात. मर्यादा अतिशय कमी ठेवल्यास जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थावर चेतावणी द्यावी लागेल, तर त्या खूप जास्त ठेवल्यास आरोग्यास अपायकारक प्रमाणाकडे दुर्लक्ष होऊ शकते, असेही न्यायालयाने नमूद केले. याशिवाय, पॅकेज्ड खाद्यपदार्थांमधील पोषणमूल्ये आणि त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत लहान मुलांसह सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली.

दरम्यान, ‘3S अँड अवर हेल्थ सोसायटी’ या संस्थेने पॅकेज्ड खाद्यपदार्थांमधील मीठ, साखर आणि चरबीच्या अधिक प्रमाणाबाबत ग्राहकांना स्पष्ट इशारा देणारी ‘फ्रंट ऑफ पॅक वॉर्निंग लेबल’ (FOPL) प्रणाली लागू करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला नियमांचा मसुदा तयार करून त्यावर संबंधित घटकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यास सांगितले आहे. नियम लवकरात लवकर अंतिम करून अधिसूचित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी दहा आठवड्यांनी होणार असून, त्यावेळी नियमांच्या मसुद्याबाबतची प्रगती तपासली जाणार आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर