मुंबई

Mumbai News : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सुनावणी पूर्ण; न्यायालायने निकाल ठेवला राखून

Mumbai News : मुंबई – उच्च न्यायालयात दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी संबंधित याचिकेवरील अंतिम सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. सुनावणीदरम्यान, आदित्य ठाकरेंच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सुदीप पासबोला यांनी याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला. या युक्तिवादात केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांची मुले निलेश आणि नितेश राणे यांचा उल्लेख झाला असल्याचे समोर आले आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सुनावणी सुरु असताना न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने तपासातील अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित केले. https://maharashtramirror.com/ Mumbai News
पण, या टप्प्यावर न्यायालय कोणताही अंतिम निष्कर्ष काढत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. उपलब्ध कागदपत्रांमधील काही बाबींची सखोल छाननी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारीही सरकारी वकील शिशिर हिरे यांचा युक्तिवाद पाहायला मिळाला. दरम्यान, राजकारण्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीत आम्हाला काही रस नसून एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे, याच दृष्टीने आम्ही या प्रकरणाकडे बघतो असे न्यायालयाने म्हटल्यामुळे शुक्रवारी राजकारण्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीत आम्हाला काही रस नसून एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे, याच दृष्टीने आम्ही या प्रकरणाकडे बघतो असे न्यायालयाने म्हटले होते.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button