ठाणे

Thane Police : ठाणे पोलीस आयुक्तालयात ‘100 दिवसांच्या कृती आराखडा’ अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे यशस्वी आयोजन‌

• 100 दिवसांच्या कृती आराखडा’ अंतर्गत विशेष तक्रार निवारण

ठाणे :- ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ आणि जागेवरच निराकरण करण्याच्या उद्देशाने ‘100 दिवसांच्या कृती आराखडा’ अंतर्गत विशेष तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या या तत्पर कारभाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस दलाच्या या अभिनव उपक्रमाने सामान्य जनतेच्या आणि पोलिसांमधील विश्वासाचा दुआ आणखी मजबूत केला आहे.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्यक्ष उपस्थिती ,प्रत्यक्ष संवादातून तक्रारींचे जागेवरच उच्चाटन

दिनांक 07 नोव्हेंबर (शनिवार) ते दिनांक 08 नोव्हेंबर (रविवार) या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयात या विशेष तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय उपक्रमांतर्गत एकूण 1053 अर्जदारांना त्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी विशेष Sआज्ञापत्राद्वारे बोलवण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्यक्ष 742 अर्जदार या महत्त्वाच्या कार्यक्रमात स्वतः उपस्थित राहिले. या विशेष कार्यक्रमास ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच इतर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रत्येक अर्जदाराची समस्या अत्यंत सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतली आणि कायदेशीर मार्गाने त्यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी पावले उचलली.

विक्रमी अर्जांची तात्काळ निर्गत व जनतेकडून कृतज्ञता

या तक्रार निवारण शिबिरादरम्यान ठाणे पोलीस आयुक्तालयाने मोठी कामगिरी करत तब्बल 668 अर्जांची तात्काळ अर्जदारांसमोरच यशस्वी निर्गत (निवारण) केली. उर्वरित अर्जांच्या बाबतीतही संबंधितांना पुन्हा बोलवून त्यांच्या तक्रारींचे अल्पावधीतच पद्धतशीरपणे निरसन करण्याचे नियोजन प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. पोलिसांनी अर्जदारांना केवळ कागदावर नाही, तर प्रत्यक्ष समोरासमोर बोलावून जागेवरच त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या. या कृतीशील आणि संवेदनशील भूमिकेमुळे सर्व उपस्थित अर्जदारांनी व नागरिकांनी कमालीचे समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी ठाणे शहर पोलिसांच्या या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानत पोलीस प्रशासनाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button