मुख्य मजकुराकडे जा

Mumbai News : कोकणकरांसाठी रेल्वेची खूशखबर

मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कोकणकरांसाठी रेल्वेची खूशखबर
कोकणकरांसाठी रेल्वेची खूशखबर

Mumbai News : गणपतीसाठी मुंबई-मडगाव दरम्यान धावणार विशेष गाड्या


मुंबई : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणारे प्रवाशी खूप असतात. ही गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-मडगावदरम्यान चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मडगाव आणि परतीच्या मार्गावर या विशेष गाड्यांच्या दोन-दोन फेऱ्या होणार आहेत. • गाडी क्रमांक ०१००७ सीएसएमटी-मडगाव विशेष गाडी ११ आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री १२.४० वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता मडगावला पोहोचेल.https://maharashtramirror.com/ Mumbai News
• गाडी क्रमांक ०१००८ मडगाव-सीएसएमटी विशेष गाडी ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मडगावहून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.https://maharashtramirror.com/ Mumbai News
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबे असतील.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper