Pune News : दिवाळीच्या खरेदीसह फुलबाजारातही तेजी; आवक आणि मागणीत वाढ
Pune News :पुणे : दिवाळीच्या सणामुळे बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच मार्केट यार्डातील फुलबाजारही फुलांनी बहरला आहे. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी वाढल्याने बाजारात आवक वाढली असून, फुलांच्या दरातही मागील चार दिवसांच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, यंदा पाणीटंचाईचा फुलांच्या उत्पादनावर आणि दर्जावर परिणाम झाला आहे. बाजारात दाखल होणाऱ्या फुलांपैकी केवळ २५ टक्के माल दर्जेदार असल्याने चांगल्या आणि हलक्या दर्जाच्या फुलांच्या दरात मोठी तफावत पाहायला मिळत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
लक्ष्मीपूजन रविवारी (दि. ८) असल्याने शुक्रवारी मार्केट यार्डात फुलांची मोठी आवक झाली. झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असून, लक्ष्मीपूजनासाठी शेवंतीला विशेष महत्त्व असल्याने तिचीही आवक वाढली आहे. याशिवाय गुलछडी आणि अॅस्टर या फुलांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या विविध भागांतून फुले बाजारात दाखल होत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
यंदा गणेशोत्सवाचे पहिले पाच दिवस आणि नवरात्रीचे शेवटचे काही दिवस वगळता फुलांना अपेक्षित मागणी नव्हती. त्यामुळे दर कमी राहिले होते. दिवाळीत चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फुले राखून ठेवली होती. आता हा माल बाजारात येत आहे.
अखिल फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर आणि समन्वयक सागर भोसले यांनी पुढील दोन दिवस फुलांची आवक मोठी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी (दि. १०) दिवाळी पाडव्यालाही फुलांना मागणी राहणार असल्याने बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.


