पुणे

Pune Crime News : पुणे येरवड्यातील घटना ; आंतरजातीय विवाह केलेल्या बहिणीच्या नवऱ्याच्या वडिलांना जीवे ठार मारले.

Pune Crime News बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने केली मुलाच्या वडिलांची हत्या; पुण्यातील येरवड्यातील घटना,पुण्यात येरवडा येथे एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. बहिणीला पळून नेल्याने एका भावाने मुलाच्या वडिलांचा खून केला आहे, आरोपीला तात्काळ अटक

पुणे :- राजीव गांधीनगर येरवडा येथे हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. बहिणीला पळून नेल्याच्या रागातून एकाने मुलाच्या वडीलाची हत्या केली. कटाळू कचरू लहाटे (55 वर्ष) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर इस्माईल शेख (25 वर्ष) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. खून झालेल्या व्यक्तीचा मुलगा आणि आरोपी व त्याची बहीण मित्र आहे. आरोपीच्या बहिणीला त्याने पळून नेल्याने खुनाची ही घटना सोमवारी घडली आहे.

संतापाच्या भरात इस्माईल शेखने सोमवारी (24 जुन,2024) लहाटे हे घराजवळ उभे असतांना दुचाकीवरून मित्रासह आलेल्या इस्माईलने लहाटे यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात कटाळू यांच्या डोक्याला, हातावर गंभीर जखमा झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. यामुळे यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लहाटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपी इस्माईल शेखला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटिल व तपास पथकाचे अंमलदार यांनी तेथे जावून बातमीप्रमाणे दोन इसम थांबलेले दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता इस्माईल रियाज शेख (23 वर्ष) ( रा राजीव गांधी नगर येरवडा पुणे) व संकेत उमेश गुप्ता (21 वर्ष) (रा राजीव गांधीनगर येरवडा पुणे) असे असल्याचे सांगितल्याने त्याचेकडे चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबूली दिल्याने व त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेने त्यांना 24 जुन 2024 रोजी अटक करुन 12 तासाचे आत गुन्हा उघडकीस आणला आहे.

19 जुन रोजी फिर्यादी हे कस्तुरबा हौसिंग सोसायटीचे मागील नाल्यामध्ये चेंबर बांधण्याचे काम करीत असताना चिखल अंगावर उडाला म्हणून आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन दगडाने मारुन जबर जखमी केले म्हणून येरवडा पोलीस स्टेशन येथे भादवि 323,326,504,304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी हे दवाखान्यात उपचारादरम्यान मयत झाल्याने सदर गुन्हयात भादवि 302 अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे. गुन्हयातील आरोपी हे राहते घरी असल्याची माहिती तपास पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, कैलास डुकरे यांना मिळाली. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटिल व तपास पथकाचे अंमलदार यांनी तेथे जावून बातमीप्रमाणे दोन इसम थांबलेले दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता प्रणव वाल्मीक अनंत्रे (20 वर्ष) (रा दिधी पुणे) व राज सोमनाथ परदेशी (19 वर्ष) (मु पो कुरुळी ता खेड पुणे) असे असल्याचे सांगितल्याने त्यावेकडे चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबूली दिल्याने व त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झालेने त्यांना 20 जुन रोजी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

पोलीस पथक
मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4 विठ्ठल दबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे पोना सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0