मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतेआळंदी जवळील गावात अखेर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

स्वितोलिना उपांत्य फेरीत; सबालेंकाला धक्का! सहा वर्षांनंतर मिळवला विजय

युक्रेनची टेनिसपटू एलिना स्वितोलिनाने डब्ल्यूटीए फायनल्स २०२६ स्पर्धेत मोठा उलटफेर केला.

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

स्वितोलिनाचा सबालेंकाला धक्का!
सहा वर्षांनंतर मिळवला विजय; WTA फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक

इंडियन वेल्स : युक्रेनची टेनिसपटू एलिना स्वितोलिनाने डब्ल्यूटीए फायनल्स २०२६ स्पर्धेत मोठा उलटफेर केला. बेलारूसच्या अव्वल खेळाडू आर्यना सबालेंकाचा ६-३, ३-६, ६-१ असा पराभव करत स्वितोलिनाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयासह तिने तब्बल सहा वर्षांनंतर सबालेंकाविरुद्ध विजय मिळवला. या पराभवामुळे सबालेंकाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सामन्यात स्वितोलिनाने पहिला सेट ६-३ असा जिंकत आघाडी घेतली. मात्र, सबालेंकाने दुसऱ्या सेटमध्ये ६-३ अशी बाजी मारत सामना बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सबालेंकाने सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र, स्वितोलिनाने जोरदार पुनरागमन करत सलग सहा गेम जिंकले आणि ६-१ असा सेट जिंकून सामना खिशात घातला.

या सामन्यात सबालेंकाकडून तब्बल ३५ अनफोर्स्ड एरर्स झाल्या. स्वितोलिनाने याचा पुरेपूर फायदा घेत आठपैकी सहा ब्रेक पॉइंट्स जिंकले. चौथ्या मॅच पॉइंटवर तिने विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, २०२० नंतर स्वितोलिनाने प्रथमच सबालेंकाला पराभूत केले आहे. तसेच, २०१९ नंतर पहिल्यांदाच तिने डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper