मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
जागतिक नेमबाजी स्पर्धेत विवान कपूरची रौप्य भरारी; भारताला लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचा कोटा!गोकु‍‍ळचे दूध दोन रुपयांनी महागण्याची शक्यतापुण्यात ३१ किलोमीटरचे दोन नवे भुयारी मार्गपश्चिम महाराष्ट्र-कोकण तीन भुयारी मार्गांनी जोडणारकाळेवाडीत कोयत्याने वार करून तरुणावर हल्लाराहुल गांधींचा फोन टॅप केल्याचा आरोप; नाना पटोलेंचा मोदी सरकारला इशारा

गोकु‍‍ळचे दूध दोन रुपयांनी महागण्याची शक्यता

उद्या दरवाढीवर निर्णय, प्रशासक काळातील २४ कोटींच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी हालचाली

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

गोकु‍‍ळचे दूध दोन रुपयांनी महागण्याची शक्यता
उद्या दरवाढीवर निर्णय

कोल्हापूर : गोकुळच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दूध उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या खरेदी दरातही प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ अपेक्षित आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उद्या (शनिवारी) होणाऱ्या नव्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

गोकुळचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील यांनी दूध दरवाढीचे संकेत दिले आहेत. प्रशासकाच्या कार्यकाळात दूध संघाला सुमारे २४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे त्यांनी सांगितले. हा तोटा भरून काढण्यासाठी दूध विक्री दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडू नये, यासाठी दरवाढ मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दूध विक्री दरात वाढ झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खरेदी दरातही वाढ करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे प्रस्तावित दरवाढीचा फायदा दूध उत्पादकांना मिळण्याची अपेक्षा आहे. दरवाढीची नेमकी रक्कम आणि अंमलबजावणीची तारीख याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, अमूल आणि मदर डेअरीसह विविध दूध ब्रँडच्या दरांत अलीकडेच वाढ झाली आहे. आता गोकुळनेही दरवाढ केल्यास ग्राहकांच्या दूध खरेदीवरील मासिक खर्चात आणखी भर पडू शकते. त्यामुळे उद्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper