मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासा

Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृती चांगली असल्याची प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळेंची माहिती

•Sharad Pawar Admitted to Hospital दम लागत असल्याने आणि डिहायड्रेशनच्या त्रासामुळे तपासणीसाठी रुग्णालयात नेल्याची माहिती; प्रफुल्ल पटेल यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस, चिंतेचे कारण नसल्याचे स्पष्ट

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

Sharad Pawar Admitted to Hospital

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्याहून मुंबईला कारने येत असताना त्यांना थोडा दम लागत होता तसेच डिहायड्रेशनचा त्रास जाणवत असल्याने तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली असून, त्यांची प्रकृती चांगली असून चिंतेचे कोणतेही कारण नसल्याची माहिती दिली आहे.

प्रफुल्ल पटेल यांची भेट; प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्टीकरण

मीडियाच्या माध्यमातून शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. पटेल यांच्या मुलीच्या सासूबाईंवरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद पवारांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की, पवार पुण्याहून मुंबईला कारने येत असताना त्यांना थोडा दम लागत होता आणि ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे डॉक्टर असल्याने ते तपासणीसाठी आले आहेत. पटेल यांनी त्यांच्या पत्नीशी तसेच पीएशीही चर्चा केली. भेट घेतली तेव्हा शरद पवार जेवत होते; त्यांनी हसून हात दाखवला आणि पटेल यांनी त्यांना जेवण करून प्रकृतीची काळजी घेण्यास सांगितले. त्यांना जास्त त्रास न देता पटेल तिथून निघाले आणि प्रकृती चांगली असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळेंची एक्स पोस्ट; विश्रांतीचा सल्ला व कामावरील प्रेम

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक्स पोस्टच्या माध्यमातून शरद (Sharad Pawar) पवारांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. डॉक्टरांनी प्रवास कमी करण्याचा आणि पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी बाबा ऐकत नाहीत आणि त्यांना कामात रमून जायला तसेच आपल्या कामावर प्रेम असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच बाबांची तब्येत ठीक असून सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी कफचा त्रास झाल्यानंतर उपचार घेऊन त्यांची प्रकृती सुधारली होती आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, त्यानंतर आता नियोजित तपासणीसाठी ते रुग्णालयात आले आहेत.

शेअर करा