मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासा

Sanjay Raut : खासदारांना 150 कोटींची ऑफर दिल्याचा संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकीय खळबळ

• डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 100 कोटींवरून 150 कोटींवर पोहोचल्याचा दावा; अमित शहांच्या मुंबई दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह, छगन भुजबळांनी मागितले पुरावे

पस
पियुषा सावंत

2 मिनिट वाचन

Sanjay Raut

मुंबई :- मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांना 150 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी हा आकडा 100 कोटी रुपये होता आणि आता तो 150 कोटी रुपयांवर पोहोचल्याचा दावा राऊत यांनी केल्याने राज्याच्या व देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

डिलिमिटेशनसाठी खासदारांची खरेदी सुरू असल्याचा दावा; अमित शहांच्या दौऱ्यांवर निशाणा

मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर खासदारांशी संपर्क साधला जात असून डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी 150 कोटी रुपयांचा दर लावला जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्यावरून सरकारवर टीका करताना त्यांनी आरोप केला की, भाजपकडून बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वारंवार होणाऱ्या मुंबई दौऱ्यांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा पैसा मुंबईमार्गे पाठवला जात असल्याचा संशय व्यक्त केला. मात्र, कोणत्या खासदारांशी संपर्क साधला गेला किंवा या दाव्याचे ठोस पुरावे काय आहेत, याबाबत राऊत यांनी कोणतीही नावे किंवा पुरावे अद्याप समोर आणलेले नाहीत.

भुजबळांनी मागितले पुरावे; राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप तीव्र

संजय राऊत यांच्या या 150 कोटींच्या दाव्यावर सत्ताधारी बाजूकडूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी या दाव्यातील तथ्य फेटाळून लावत राऊतांकडे पुराव्यांची मागणी केली आहे. कोणी शंभर कोटी, कोणी दीडशे तर कोणी हजार कोटींचा आकडा सांगत असून, पुराव्यांशिवाय केवळ दावे करून चर्चा करण्यात अर्थ नसल्याचा टोला भुजबळांनी लगावला. दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी अधिवेशन, डिलिमिटेशन विधेयक आणि राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा