मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Spa Sex Syndicate | सेक्स सिंडीकेटचे आका 'रहिम-अमित' यांचे इंटरनॅशनल कनेक्शन?

Pune Spa Sex Syndicate | विमानतळ येथील मेंशन स्पा रेड मधून धक्कादायक माहिती उजेडात

M
mubarak

1 मिनिट वाचन

spa sex syndicate

  • Pune Spa Sex Syndicate | विमानतळ येथील मेंशन स्पा रेड मधून धक्कादायक माहिती उजेडात
  • पुणे, दि. 11 जुलै, महाराष्ट्र मिरर
    मुबारक जिनेरी | Pune Spa Sex Syndicate | Maharashtra Mirror Exclusive

    पुणे शहरातील उच्च भ्रू विमानतळ परिसरात स्पाच्या नावाखाली चाललेल्या हाई-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी भांडाफोड केल्यानंतर आता धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. पुणे शहर व उपनगरात चाललेल्या हाई प्रोफाईल सेक्स रॅकेटचे सिंडीकेट याच आकांकडून हाताळले जात असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आका रहिम-अमित यांचे सेक्स सिंडीकेट इंटरनॅशनल असून थेट थायलंडपर्यंत त्याचे धागेदोरे असण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील अवैध धंद्यांना समुळ नष्ट करणारे धडाकेबाज पोलीस आयुक्त अमितेश कुमार या आकांच्या सेक्स सिंडीकेटला मोडण्यासाठी मोठे पाऊल घेण्याची शक्यता आहे. Pune Spa Sex Syndicate, Pune Crime News

    छायाचित्रे · 1/1

    Arrow Keys ⟵ ⟶

    एकाच स्पा सेंटरमधून 10 परदेशी तरूणी मिळणे धक्कादायक

    विमानतळ येथील मेंशन स्पा येथे पुणे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 10 परेदशी तरूणी आढळून येणे ही चिंताजनक बाब आहे. यात आणखी महत्वाचे म्हणजे 10 तरूणी थायलंडच्या असल्याने सेक्स सिंडीकेट इंटरनॅशनल लेवलवर हाताळले जात असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी यात आणखी तपास केल्यास अनेक धक्कादायक माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे. Pune Spa Sex Syndicate

    व्यवस्थापकाला समोर करून आका पाठमोरा…

    स्पा सेंटर चालविण्यासाठी आका रहिम-अमित व्यवस्थापकाला समोर करून स्वतः पाठमोरे राहत असल्याची सूत्रांची माहिती आहे. अशा प्रकारे पुणे शहरात अनेक ठिकाणी यांचे नेटवर्क असून व्यवस्थापकाला बळीचा बकरा करून हे सिंडीकेट मोठ्या शिफातीने चालविले जात आहे.

    रहिम-अमितचे कनेक्शन तपासले जाणार?

    मेंशन स्पाच्या निमित्ताने रहिम-अमितचे नाव समोर आल्यानंतर या आकांची तपासणी पोलिस प्रशासनाकडून होणार का? त्यांची नावे गुलदस्त्यातच ठेवण्यात येणार हे पहावे लागणार आहे.

    हेही वाचा: Sanjay Raut : "शिंदेंनी शहांचे पाय धुतले, मुख्यमंत्रिपदाची पुन्हा ऑफर दिली" – संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

    शेअर करा