मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sanjay Raut : "शिंदेंनी शहांचे पाय धुतले, मुख्यमंत्रिपदाची पुन्हा ऑफर दिली" – संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

•"शिंदेंचा गट दिल्ली-गुजरातच्या आदेशावर चालतो, शिवसेना नव्हे" – राऊतांचा घणाघात

V
Vivek

2 मिनिट वाचन

sanjay-raut_tweet for rahul gandhi

•"शिंदेंचा गट दिल्ली-गुजरातच्या आदेशावर चालतो, शिवसेना नव्हे" – राऊतांचा घणाघात

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. "एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने पूजा केली, त्यांचे पाय धुतले, त्यांच्या चरणांवर डोकं ठेवले. याचा फोटो माझ्याकडे नसला तरी संपूर्ण माहिती आहे," असा दावा राऊतांनी केला.

राऊत म्हणाले, "शिंदे यांनी फडणवीस आमचं काम करू देत नाहीत अशी तक्रार शहांकडे केली आणि त्यानंतर भाजपमध्ये सामील होण्याची पुन्हा ऑफर दिली." शिंदे यांनी म्हणे, "मला मुख्यमंत्री करा, मी मराठी माणसांची एकजूट थांबवतो," असा प्रस्ताव शहांसमोर ठेवला होता. मात्र शहांनी मुख्यमंत्री भाजपचाच राहील हे स्पष्ट केल्यावर शिंदे यांनी संपूर्ण गटासह भाजपमध्ये यायची तयारी दाखवली, असं राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की, "शिंदे गटाचे मुख्य नेते दिल्लीत किंवा गुजरातमध्ये आहेत. ते शिवसेनाप्रमुखांच्या समाधीवर कौल घेऊन निर्णय घेत नाहीत." शिंदे यांचा दिल्लीत जाण्याचा कार्यक्रम आधीपासून ठरलेला होता आणि त्यामागची माहिती माझ्याकडे नेहमीप्रमाणे आधीपासून आहे, असे राऊतांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, "दिल्लीच्या राजकारणामध्ये मला शिंदेंपेक्षा जास्त माहिती आहे. केंद्रातील तपास यंत्रणांकडे काही गंभीर पुरावे लागले आहेत, लवकरच शिंदे गटातील काहीजण अडचणीत येतील."

संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, "राज्यात 95 हजार कोटींची कामं टेंडरशिवाय वाटण्यात आली आहेत. यासाठी काही ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आले. आता अनेक ठेकेदार काम मिळत नसल्यामुळे ते उघड बोलू लागले आहेत, तर काही थेट कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत."

शिवसेनेचेच आमदार संजय शिरसाट यांचा व्हिडिओ मिळाल्याचा दावा करत राऊत म्हणाले, "त्यांच्या बँगमध्ये नोटांचे बंडल दिसत आहेत. ही दृश्ये समाजात जात आहेत. सरकारमध्ये असल्याचा भ्रम फार काळ टिकणार नाही. योग्यवेळी पुरावे गोळा होतात आणि कारवाई होतेच."राऊत यांनी शेवटी सूचक इशारा देत सांगितले की, "ऑगस्टमध्ये काही मोठ्या घडामोडी घडतील. सध्याची आयकर नोटीस ही केवळ इशारा आहे. राजकीय पातळीवर लवकरच मोठी उलथापालथ पाहायला मिळेल."

हेही वाचा: Mumbai BEST Accident : मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात; चालक, वाहकसह सहा प्रवासी जखमी

शेअर करा