मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : चांदणी चौकात भरधाव दुचाकीची धडक; २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : चांदणी चौकाकडून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

चांदणी चौकात भरधाव दुचाकीची धडक; २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
चांदणी चौकात भरधाव दुचाकीची धडक; २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune News : दुसऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : चांदणी चौकाकडून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पारस सुधीर बोत्रे असे मृत तरुणाचे नाव आहे. २१ ऑक्टोबर रोजी रात्री हा अपघात झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.https://maharashtramirror.com/Pune News
या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ आणि ११९/१७७ नुसार आर्यन गौरव कऱ्हाडकर (वय १८, रा. कुंबरे हर्मिटेज, डी.पी. रोड, शास्त्रीनगर, कोथरूड) या दुसऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.https://maharashtramirror.com/Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारस बोत्रे हा आपल्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री प्रवास करीत होता. चांदणी चौकाकडून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर, एक्झिक्युटिव्ह सोसायटीच्या अलिकडे मुख्य राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या लेनजवळ ते आले असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या धडकेत पारस यांच्या चेहऱ्याला गंभीर मार लागला. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध झाले. अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.२४ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपी दुचाकीस्वार आर्यन गौरव कऱ्हाडकर याने वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना मेडाबलमेवार पुढील तपास करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा