मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : सहा महिन्यांपासून फरार गांजा तस्करीतील मुख्य सूत्रधार जेरबंद

Pune Crime : पुणे: गांजा बाळगून विक्री केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी हडपसर परिसरातून अटक केली.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

सहा महिन्यांपासून फरार गांजा तस्करीतील मुख्य सूत्रधार जेरबंद चार गुन्ह्यांत होता पाहिजे; आई आणि बहिणीला भेटण्यासाठी हडपसरमध्ये आल्यानंतर पोलिसांनी रचला सापळा
सहा महिन्यांपासून फरार गांजा तस्करीतील मुख्य सूत्रधार जेरबंद चार गुन्ह्यांत होता पाहिजे; आई आणि बहिणीला भेटण्यासाठी हडपसरमध्ये आल्यानंतर पोलिसांनी रचला सापळा

Pune Crime : चार गुन्ह्यांत होता पाहिजे; आई आणि बहिणीला भेटण्यासाठी हडपसरमध्ये आल्यानंतर पोलिसांनी रचला सापळा

Pune Crime : पुणे: गांजा बाळगून विक्री केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी हडपसर परिसरातून अटक केली. आरोपी मागील सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. आई आणि बहिणीला भेटण्यासाठी तो हडपसरमधील नव्या म्हाडा कॉलनीत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अजय पोपटराव पाडुळे (वय ३०, रा. हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime

३५ किलो गांजा प्रकरणातील आरोपी


भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चारुदत्त काळूराम चव्हाण आणि अजय पाडुळे यांच्याविरुद्ध ३५ किलो ७६ ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांचा हा साठा व्यावसायिक प्रमाणातील असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्याच्या कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) आणि २९ अन्वये कारवाई करण्यात आली. तपासामध्ये पाडुळे हा पुणे शहरातील गांजा विक्री व्यवसायाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime

महाराष्ट्राबाहेर झाला होता पसार


गुन्हा दाखल झाल्यानंतर पाडुळेने पुणे शहरातून आपले अस्तित्व लपवले होते. त्यानंतर तो महाराष्ट्राबाहेर पसार झाल्याने पोलिसांना सापडत नव्हता. भारती विद्यापीठ पोलिसांकडून त्याचा सातत्याने शोध घेतला जात होता.https://maharashtramirror.com/ Pune crime

तपास पथकाला पाडुळे हा आई आणि बहिणीला भेटण्यासाठी हडपसरमधील पुरंदर चौक, नवीन म्हाडा कॉलनी परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला.

नातेवाइकांना भेटण्यासाठी आला अन् पकडला


पाडुळे आई आणि बहिणीला भेटण्यासाठी परिसरात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला ५ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली. न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत.

आरोपीकडून गांजा तस्करीची साखळी, अमली पदार्थांचा पुरवठा करणारे आणि शहरात त्याची विक्री करणाऱ्या इतर व्यक्तींची माहिती मिळवण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.

चार गुन्ह्यांमध्ये होता पाहिजे


पोलिसांच्या माहितीनुसार, पाडुळे चार गांजा विक्री प्रकरणांमध्ये पाहिजे होता या सर्व प्रकरणांमध्ये अमली पदार्थविरोधी कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई


पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव यांच्या सूचनांनुसार पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलिस अंमलदार किरण साबळे, मंगेश गायकवाड, मंगेश पवार, तुकाराम सुतार, संदीप आगळे आणि त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

शेअर करा