मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News | मंगळसूत्र हिसकावणारे ताब्यात : २ लाखांचा मुद्देमाल जप्त : चतुशृंगी पोलिसांची कामगिरी

वपोनि महेश बोळकोटगी यांच्याकडून कारवायांचा सपाटा

M
mubarak

2 मिनिट वाचन

Pune Crime News | मंगळसूत्र हिसकावणारे ताब्यात : २ लाखांचा मुद्देमाल जप्त : चतुशृंगी पोलिसांची कामगिरी

  • वपोनि महेश बोळकोटगी यांच्याकडून कारवायांचा सपाटा
  • पुणे, दि. १५ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News

    शिवनेरी पार्क लेन, गणराज अपार्टमेंट येथे वयोवृद्ध महिला तिच्या नातेसह जात असताना दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करत दोघा चोरट्यांना चतुशृंगी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

    संशयित १) संजय रमेश बाबरे, वय 29 वर्ष, रा. मु पो लोणी बुद्रुक, हसनापुर रोड, विखे वस्ती, ता. राहता, जि. अहमदनगर व २) राहुल रमेश मावस, वय 24 वर्ष, रा. मु. नादी, पो. वीरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर दोघांना सापळा कारवाई करत बालेवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

    Sr.Pi. Mahesh Bolkotgi & Police Staff with chain snatcher.

    चतुशृंगी पोलीस स्टेशन कडील गु र क्र ७३७/२०२४ भा न्या सं कलम ३०९(४),३(५) या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे तपास करत असताना सपोनी नरेंद्र पाटील व पो शि भांगले यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून सदरचा गुन्हा हा संजय बाबरे व राहुल मावस यांनी केला असून ते बालेवाडी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या बाबत माहिती मिळवली होती.

    आरोपींना गुन्ह्यांमध्ये अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान आरोपींकडून त्यांनी जबरी चोरी केलेले एक लाख रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व गुन्हा करताना वापरलेली एक लाख रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल असा एकूण २,००,०००/- रु कि चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल ही देखील चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने येवला तालुका पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, गु. नों. क्र. २१०/२०२४ भा द वि कलम ३७९ हा वाहन चोरीचा गुन्हा देखील उघड करण्यात आला आहे.

    सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी चतुशृंगी पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, विजयानंद पाटील, स. पो. नि. नरेंद्र पाटील व तपास पथकातील अंमलदार पो हवा दुशिंग, पो हवा दुर्गे, पो शि भांगले,पो शि खरात, पो शि तरंगे यांनी केली आहे.

    हेही वाचा: Crime Reels | गजा मारणेनंतर आता कोणाचा नंबर ? : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सर्जिकल स्ट्राईकने गुंडांमध्ये धास्ती

    शेअर करा