मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Crime Reels | गजा मारणेनंतर आता कोणाचा नंबर ? : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सर्जिकल स्ट्राईकने गुंडांमध्ये धास्ती

Crime Reels | गुन्हेगारांच्या रिल्स वायरल करणारे गुन्हे शाखेच्या रडारवर

M
mubarak

1 मिनिट वाचन

crime reels gaja marne on police radar

  • Crime Reels | गुन्हेगारांच्या रिल्स वायरल करणारे गुन्हे शाखेच्या रडारवर
  • पुणे, दि. १५ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Crime Reels

    सोशल मीडियाच्या इन्स्टा, फेसबुक, व्हाट्सअप, यु ट्यूब ऍपवर गुन्हेगारांचे रिल्स वायरल करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune Police CP Ameteesh Kumar यांनी याबाबत सर्जिकल स्ट्राईक करण्याचे संकेत दिले होते. दि. १४ रोजी दुपारी गुन्हे शाखेने थेट कुख्यात गजा मारणे Gangster Gaja Marne याला रिल्सबाबत विचारणा करण्यासाठी बोलावले. यावेळी ४ तासांच्या चौकशीत गजा मारणे याला पोलिसी भाषेत सज्जड दम देण्यात आल्याचे समजते. पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने गजा मारणेनंतर आता कोणाचा नंबर ? अशी धास्ती भाई लॊकांमध्ये पसरली आहे.

    गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण नको : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

    गुन्हेगारांचे उद्दात्तीकरण करणाऱ्या रिल्समुळे युवा वर्ग गुन्हेगारी कृत्याकडे आकर्षित होत आहे. कुख्यात गुन्हेगारांकडून युवकांचा होत असलेला वापर थांबविणे गरजेचे असल्याने पोलीस आयुक्तांनी विधायक पाऊल टाकत गुन्हेगारी रिल्सवर कडक कारवाईची भूमिका घेतली आहे.

    गजा मारणे झाला, आता कोणाचा नंबर

    पुण्यात गलोगल्लीत भाई, आणि भाऊ अस्तित्वात आहेत. प्रत्येकजण आपण किती मोठा भाई आहे हे दाखविण्यासाठी रिल्सचा वापर करतात. याच रिल्समुळे भाई लोकांची भाईगिरी शाबूत राहते. परंतु पुणे पोलिसांकडून थेट कुख्यात गजा मारणेलाच चौकशीसाठी बोलविण्यात आल्याने शहरातील भाई लॊकांमध्ये धास्ती पसरली आहे.

    Crime Reels | Who's number now after hitting Gaja? : Police Commissioner Amitesh Kumar's surgical strike scares gangsters

    हेही वाचा: Dombivli Crime News : डोंबिवलीत घरफोडी, चोरट्यांनी 2.94 लाखांचा ऐवज केला लंपास

    शेअर करा