मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime News : पुण्याच्या कोंढव्यात तपास यंत्रणांची छापेमारी; 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर्स झळकल्याने खळबळ

• मध्यरात्रीपासून 18 हून अधिक ठिकाणी संयुक्त 'सर्च ऑपरेशन'; काही संशयित ताब्यात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

•मध्यरात्रीपासून 18 हून अधिक ठिकाणी संयुक्त 'सर्च ऑपरेशन'; काही संशयित ताब्यात

पुणे :- पुणे शहरातील कोंढवा परिसरात आज (गुरुवार) मध्यरात्रीपासून महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांनी मिळून मोठे संयुक्त सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. तब्बल 18 हून अधिक ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे.

या कारवाईदरम्यान, कोंढवा परिसरातील गल्लीबोळात आणि रस्त्यांवर 'आय लव्ह मोहम्मद' (I Love Mohammad) आशयाचे बॅनर्स झळकताना दिसत असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

छापेमारी आणि बॅनरबाजीचा संबंध?

तपास यंत्रणा एका बाजूला कोंढवा परिसरात मोठी शोधमोहीम राबवत असताना, त्याच रस्त्यांवर दोन ते तीन ठिकाणी हे बळ्नर लावल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या छापेमारीचा आणि बॅनरबाजीचा काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे आणि पोलीस त्या दिशेने तपास करण्याची शक्यता आहे. सध्या परिसरात हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत.

दहशतवादी कटाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

या संयुक्त कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कोंढवा परिसराचे महत्त्व असे आहे की, दोन वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी याच भागातून बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना अटक केली होती. त्यावेळी देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात तपास यंत्रणांना यश आले होते. त्याच भागात आता पुन्हा काही संशयित तपास यंत्रणांच्या नजरेत आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेसाठी 410 कोटींचा निधी वळता; SC/नवबौद्ध महिलांसाठी वापरण्याच्या स्पष्ट सूचना

शेअर करा