मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेसाठी 410 कोटींचा निधी वळता; SC/नवबौद्ध महिलांसाठी वापरण्याच्या स्पष्ट सूचना

•सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वाचा निर्णय; निधी वितरणाचे नियम निश्चित

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ladki Bhain Yojna Money: Good news about Ladki Bhain Yojana! The wait for April installment is over, Aditi Tatkare gave a big update

•सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वाचा निर्णय; निधी वितरणाचे नियम निश्चित

मुंबई :- राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठी पाऊल उचलले आहे. या योजनेसाठी विभागांतर्गत येणाऱ्या 410.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळता करण्यात आला आहे.

सामाजिक न्याय विभागाने या निधीसंदर्भात बुधवारी शासन निर्णय (GR) जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, महिला व बालविकास विभागाने हा निधी केवळ अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठीच वापरण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत.

निधी वितरण आणि नियम

नियतव्यय: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाने एकूण 3960 कोटी इतका नियतव्यय मंजूर केला आहे.

सप्टेंबरचा हप्ता: वित्त विभागाने ठरवून दिलेल्या कार्यप्रणालीनुसार, सप्टेंबर महिन्यातील पात्र महिलांना हप्ता देण्यासाठी सहायक अनुदानामधून 410.30 कोटी इतका निधी महिला व बालविकास कल्याण विभागाला बुधवारी मंजूर करण्यात आला.

दुहेरी लाभावर निर्बंध

या निधीला मंजुरी देताना सामाजिक न्याय विभागाने एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे: संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 'लाडकी बहीण' योजनेचा हप्ता मिळणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली आहे. म्हणजेच, विभागांतर्गत अन्य शासकीय निवृत्तिवेतन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळणार नाही.

या शासन निर्णयामुळे आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण लवकरात लवकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: Thane Crypto Scam : ठाण्यात क्रिप्टोचं मायाजाल! ‘ORIS.TEAM, POLAND’च्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक — सूत्रधार खुराणा फरार, पोलिसांच्या तपासाला ब्रेक का?

शेअर करा