मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : सहा महिन्यांपासून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात;गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने भवानी पेठेतून ताब्यात घेतले.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सहा महिन्यांपासून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात;गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई
सहा महिन्यांपासून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात;गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने भवानी पेठेतून ताब्यात घेतले. मोईन आसिफ घोडके (वय २५, रा. भवानी पेठ, पुणे) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई १५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.https://maharashtramirror.com/ Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडके याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रमोद जगताप आणि पोलीस अंमलदार उमेश शेलार यांना घोडके त्याच्या राहत्या घराजवळ आल्याची माहिती मिळाली.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन घोडके याला ताब्यात घेतले. त्याची ओळख निश्चित केल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रमोद जगताप, उमेश शेलार, किरण मोरे, सचिन कोळी आणि अविनाश दळवी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा