मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Bribe News : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकसह एकाला पकडले,‘एसीबी’ची टाकळी हाजी पोलीस चौकीत कारवाई

•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक आणि एक खाजगी व्यक्तीला लाच प्रकरणी ताब्यात घेतले आहे, अटक करू नये याकरिता मागितली होती 25 हजार रुपयांची लाच

V
Vivek

1 मिनिट वाचन

लाचलुचपत प्रतिबंध विभाग,ठाणे

•लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी कारवाई करत पोलीस उपनिरीक्षक आणि एक खाजगी व्यक्तीला लाच प्रकरणी ताब्यात घेतले आहे, अटक करू नये याकरिता मागितली होती 25 हजार रुपयांची लाच

पुणे :- शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये मुलाला अटक होऊ नये याकरिता पोलीस उपनिरीक्षक आणि एका खाजगी व्यक्तीने तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी एसीबीने कारवाई करत खाजगी व्यक्ती आणि पोलीस उपनिरीक्षक यांना ताब्यात घेतले आहे. लाच स्वीकारताना एसीबीने ने टाकळी हाजी पोलीस चौकीत धाड टाकत ताब्यात घेतले आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, माणिक बाळासाहेब मांडगे पोलीस उपनिरीक्षक शिरूर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण आणि खाजगी व्यक्ती सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई, शिरूर पुणे) यांना दहा हजाराची लाच स्वीकारताना अटक केली आहे.यातील तक्रारदार यांच्या मुलाच्या विरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच त्याला गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे यांनी तक्रारदार यांचेकडे 25 हजारांची लाच मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.

तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे यांनी तक्रारदार यांचे मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना सुभाष मुंजाळ (खाजगी व्यक्ती) याचेशी बोलण्यास सांगितले. खाजगी व्यक्ती सुभाष मुंजाळ यांने तक्रारदाराकडे साहेबांना देण्यासाठी म्हणून दहा हजार रुपये लाच मागणी केली आहे ‌ पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे यांनी दुजोरा देवून त्यांनी सुद्धा दहा हजार रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले आहे. आज 24 ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे व खाजगी इसम सुभाष मुंजाळ यांचेवर शिरुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार अधिनियमन 7,7(अ),12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर तपास करत आहेत.

हेही वाचा: विनेश फोगट यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्याकडे मागितली मते, 'फक्त एक महिला…'

शेअर करा