मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : गणेशोत्सवासाठी पीएमपीएमएलची ६२६ जादा बसेसची मोठी सोय: रात्री २ वाजेपर्यंत मिळणार बस सेवा

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर - गणेशोत्सवादरम्यान पुण्यात देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) एक हजारहून अधिक विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

गुजरात, सौराष्ट्र-कच्छला जोरदार पावसाचा इशारा
गुजरात, सौराष्ट्र-कच्छला जोरदार पावसाचा इशारा


Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर -
गणेशोत्सवादरम्यान पुण्यात देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) एक हजारहून अधिक विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ही खास बससेवा १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दोन टप्प्यांत चालवली जाणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

दोन टप्प्यांत बस सेवांचे नियोजन


• पहिला टप्पा (१७, १८ आणि २४ सप्टेंबर): गर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत दररोज १७३ जादा बसेस सोडल्या जातील.
• दुसरा टप्पा (१९ ते २३ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर): भाविकांच्या वाढत्या प्रतिसादानुसार सर्वाधिक ६२६ जादा बसेस विविध मार्गांवर धावतील.

प्रवाशांसाठी महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि नियम


• रात्री २ वाजेपर्यंत गाड्या: रात्रीच्या प्रवाशा सोयीसाठी या विशेष बसेस (यात्रा स्पेशल) मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहतील.
• तिकीट आणि पास नियम: रात्रीच्या प्रवासासाठी नियमित तिकीट दरच आकारले जातील. सर्व प्रकारच्या बस पासधारकांना रात्री बारा वाजेपर्यंतच पासची सवलत लागू असेल; १२ नंतर नियमित तिकीट काढावे लागेल.
• बदललेले मार्ग: सायंकाळी मध्यवर्ती भागातील मुख्य रस्ते (शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड) वाहतुकीसाठी बंद राहिल्याने बसेस पर्यायी मार्गाने वळवण्यात येतील.
मुख्य बसस्थानके आणि स्थानक बदल स्वारगेट, हडपसर, मनपा भवन, डेक्कन, काँग्रेस भवन आणि डेंगळे पुलासह पिंपरी-चिंचवड व मेट्रो स्टेशनवरून (पिंपरी आणि रामवाडी) उपनगरांसाठी विशेष बसेस सुटतील.
तसेच, २५ सप्टेंबर २०२६ रोजी विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक बंद राहणार असल्याने तेथील बसथांबे तात्पुरते वळवण्यात आले आहेत:
• सातारा रोड (कात्रज/मार्केटयार्ड): लक्ष्मी नारायण चौक.
• सिंहगड रोड: पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) थांबा.
• हडपसर / भवानी पेठ / रास्ता पेठ: वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ).
पीएमपीएमएल प्रशासनाने सर्व गणेशभक्तांना या पर्यायी वाहतूक व्यवस्थेची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा