Pune News : गणेशोत्सवासाठी पीएमपीएमएलची ६२६ जादा बसेसची मोठी सोय: रात्री २ वाजेपर्यंत मिळणार बस सेवा
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर - गणेशोत्सवादरम्यान पुण्यात देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) एक हजारहून अधिक विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर - गणेशोत्सवादरम्यान पुण्यात देखावे आणि रोषणाई पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) एक हजारहून अधिक विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ही खास बससेवा १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दोन टप्प्यांत चालवली जाणार आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दोन टप्प्यांत बस सेवांचे नियोजन
• पहिला टप्पा (१७, १८ आणि २४ सप्टेंबर): गर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत दररोज १७३ जादा बसेस सोडल्या जातील.
• दुसरा टप्पा (१९ ते २३ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर): भाविकांच्या वाढत्या प्रतिसादानुसार सर्वाधिक ६२६ जादा बसेस विविध मार्गांवर धावतील.
प्रवाशांसाठी महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि नियम
• रात्री २ वाजेपर्यंत गाड्या: रात्रीच्या प्रवाशा सोयीसाठी या विशेष बसेस (यात्रा स्पेशल) मध्यरात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहतील.
• तिकीट आणि पास नियम: रात्रीच्या प्रवासासाठी नियमित तिकीट दरच आकारले जातील. सर्व प्रकारच्या बस पासधारकांना रात्री बारा वाजेपर्यंतच पासची सवलत लागू असेल; १२ नंतर नियमित तिकीट काढावे लागेल.
• बदललेले मार्ग: सायंकाळी मध्यवर्ती भागातील मुख्य रस्ते (शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, टिळक रोड) वाहतुकीसाठी बंद राहिल्याने बसेस पर्यायी मार्गाने वळवण्यात येतील.
मुख्य बसस्थानके आणि स्थानक बदल स्वारगेट, हडपसर, मनपा भवन, डेक्कन, काँग्रेस भवन आणि डेंगळे पुलासह पिंपरी-चिंचवड व मेट्रो स्टेशनवरून (पिंपरी आणि रामवाडी) उपनगरांसाठी विशेष बसेस सुटतील.
तसेच, २५ सप्टेंबर २०२६ रोजी विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट चौक बंद राहणार असल्याने तेथील बसथांबे तात्पुरते वळवण्यात आले आहेत:
• सातारा रोड (कात्रज/मार्केटयार्ड): लक्ष्मी नारायण चौक.
• सिंहगड रोड: पर्वती पायथा (स्वामी समर्थ मठ) थांबा.
• हडपसर / भवानी पेठ / रास्ता पेठ: वेगा सेंटर (स्वारगेट डेपो जवळ).
पीएमपीएमएल प्रशासनाने सर्व गणेशभक्तांना या पर्यायी वाहतूक व्यवस्थेची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
