मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Palkhi Sohala : पालखी सोहळ्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज

पुणे, निलेश राऊत : Palkhi Sohala : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी (दि.

DO
Dhanshree Otari

1 मिनिट वाचन

Palkhi Sohala

Palkhi Sohala : वैद्यकीय पथकांबरोबरच ६०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत

पुणे, निलेश राऊत : Palkhi Sohala : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे गुरुवारी (दि. ९) शहरात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावर ४० वैद्यकीय पथके, ४२ रुग्णवाहिका, ६ तज्ज्ञ-स्त्रीरोगतज्ज्ञ व फिजिओथेरपिस्ट आणि सुमारे ६०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत असणार आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी दिली. ( palkhi sohla pmc health arrangements )

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यासाठी पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत कळस येथील स्व. सयाजीराव कुसमाडे संकुल येथे, तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत बोपोडी येथील हॅरिस ब्रिज परिसरात करण्यात येणार आहे. Palkhi Sohala

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर २२, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर १६ अशा एकूण ३८ ठिकाणी वैद्यकीय पथके कार्यरत राहणार आहेत. भवानी पेठ व नाना पेठ येथील मुक्कामस्थळी २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल. कमला नेहरू रुग्णालय आणि चंदूमामा सोनवणे प्रसूतिगृह येथे आपत्कालीन उपचारांची विशेष व्यवस्था केली असून, कमला नेहरू रुग्णालयात १० अतिदक्षता खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्येही वारकऱ्यांना मोफत प्राथमिक उपचार उपलब्ध आहेत. Palkhi Sohala

डास प्रतिबंधक फवारणी, स्वच्छता जनजागृती
कीटकनाशक विभागाकडून पालखी मार्ग आणि विसाव्याच्या ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी, स्वच्छता आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पालखी मार्गावरील मांस व मासळीची दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Palkhi Sohala

Ashadhi Wari 2026 : पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ७ हजार पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त

प्रथमोपचार संचासह १ लाख सॅनिटरी पॅडचे वितरण
महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत एक लाख सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक पालखीसाठी प्रथमोपचार संच उपलब्ध करून देण्यात येणार असून, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारही केले जाणार आहेत.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

शेअर करा