Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यासाठी पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल
Ashadhi Wari 2026
3 मिनिट वाचन

Ashadhi Wari 2026 : पालखी मुक्काम परिसरात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही
Ashadhi Wari 2026 : पुणे, महाराष्ट्र मिरर
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे उद्या, ९ जुलै रोजी पुणे शहरात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि नियोजनबद्ध राहावी, यासाठी ९ ते ११ जुलै दरम्यान विशेष वाहतूक आराखडा लागू करण्यात आला आहे. पालखी मार्गावरील तसेच मुक्कामस्थळांजवळील अनेक प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार असून, शहरात सर्व मार्गांनी येणाऱ्या जड वाहनांना (Heavy Vehicles) पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. ashadhi wari 2026 traffic diversions pune

अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता पालखी मार्गावरील इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीवर कडक निर्बंध असतील. दरम्यान, कात्रज, वारजे, सिंहगड रस्ता, कोथरूड, शिवाजीनगर, खडकी, गोखलेनगर, येरवडा, हडपसर आणि वानवडी परिसरातून पालखी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनातर्फे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. (Ashadhi Wari 2026 )
Ashadhi Wari 2026 : पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ७ हजार पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त
९ जुलैला पहाटेपासून 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद
उद्या (९ जुलै) पहाटेपासून रात्रीपर्यंत पालखी मार्गावरील खालील रस्ते वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने बंद रातील: (Ashadhi Wari 2026 )
बोपखेल फाटा ते विश्रांतवाडी, आळंदी रस्ता
पाटील इस्टेट, वाकडेवाडी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रस्ता (COEP)
गोखले रस्ता, गणेशखिंड रस्ता, शिवाजी रस्ता
लक्ष्मी रस्ता, बेलबाग चौक, बुधवार चौक
नाना पेठ आणि भवानी पेठ परिसर.

पुणे शहरातील मध्य भागातील पर्यायी रस्ते
फर्ग्युसन रस्त्यावरील बंदोबस्तादरम्यान सेनापती बापट रस्ता, नळस्टॉप चौक व म्हात्रे पूल या मार्गांचा वापर करावा. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बंद असताना जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, लोकमान्य टिळक रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात येईल.
मुक्कामस्थळांच्या परिसरात कडक निर्बंध
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहे. त्यामुळे या दोन्ही मुक्कामस्थळांच्या परिसरात ९ जुलैच्या दुपारपासून ते ११ जुलैपर्यंत वाहनांना संपूर्ण प्रवेशबंदी राहील. या काळात शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील काही प्रमुख रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात आली आहे. (Ashadhi Wari 2026 )
Pune Rain Update : पुण्यात पावसाचा हाहाकार! जुने वाडे, भिंती कोसळल्या
तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन; आकुर्डीत मुक्काम
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज, बुधवारी दुपारी चारच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होईल. महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी आणि नियोजनाची पाहणी केली आहे. आज रात्री पालखीचा मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात असेल. त्यानंतर, गुरुवारी (९ जुलै) पहाटे पाच वाजता हा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल. (Ashadhi Wari 2026 )
इंद्रायणीला पूर; माउलींच्या पालखीचे आज मर्यादित उपस्थितीत प्रस्थान
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज, बुधवारी (८ जुलै) दुपारी श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. परंपरेनुसार माउलींची पालखी संजीवन समाधी मंदिरातून बाहेर पडेल. यानिमित्त मुख्य मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Ashadhi Wari 2026 )
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
दरम्यान, परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदीतील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. पुराची ही परिस्थिती पाहता, यंदाचा प्रस्थान सोहळा मर्यादित दिंडेकरी, वारकरी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग
श्री विठ्ठल मंदिर आकुर्डी मुक्कामाहून गुरुवारी निघून चिंचवड, पिंपरी, वल्लभनगर, फुगेवाडी, दापोडी, हॅरिस ब्रिज, बोपोडी चौक, खडकी, वाकडेवाडी, पाटील इस्टेट चौक, संचेती हॉस्पिटल चौक, सिमला ऑफीस चौक, नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, संत श्री ज्ञानेश्वर पादुका चौक, संत श्री तुकाराम पादुका चौक, गुडलक चौक, गरवारे पुलावरून खंडोजीबाबा चौक, लोकमान्य टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिर चौक, सोन्या मारुती चौकमार्गे नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी पोहोचेल.
या मार्गावरील बोपोडी चौक ते चर्च चौक आणि अंतर्गत रस्ते पहाटे तीन ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहतील. मेंटल हॉस्पिटल कॉर्नर ते आळंदी रस्ता जंक्शन, सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट आणि नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक हे मार्ग गुरुवारी पूर्णपणे बंद राहतील.




