Pune crime : कल्याणीनगरमधील दुकानातून विदेशी दारूची चोरी; दोघांना अटक
कल्याणीनगरमधील दुकानातून विदेशी दारूची चोरी; दोघांना अटक
2 मिनिट वाचन

२७ हजार २०० रुपयांच्या सहा विदेशी दारूच्या बाटल्या जप्त https://maharashtramirror.com/

Pune crime, पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : कल्याणीनगर येथील ‘टॉनिक आऊटलेट’मधून विदेशी दारूच्या बाटल्या चोरल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. जीएसटी कार्यालयाजवळ संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोघांची पोलिसांनी चौकशी करून त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता विदेशी दारूच्या सहा बाटल्या आढळून आल्या Pune crime
चौकशीत या बाटल्या कल्याणीनगरमधील दुकानातून चोरल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून एकूण २७ हजार २०० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या सहा बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. रोहन राम कांबळे (वय २८, रा. बी विंग, प्रिस्टीन सिटी, बकोरी गाव, ता. हवेली, जि. पुणे) आणि अमित महादेव सितापुरे (वय २७, रा. सिद्धार्थनगर, मच्छी मार्केट, येरवडा गाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड करीत आहेत. Pune crime,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी तसेच वाहनचोरी, अवैध शस्त्रे बाळगणारे आणि अन्य बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी (दि. १८) येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या आदेशानुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड आणि त्यांचे पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. याचदरम्यान पोलीस अंमलदार संदीप जायभाय यांना जीएसटी कार्यालयाजवळ काही तरुण संशयास्पदरीत्या थांबले असून, त्यांच्याकडे चोरीचे साहित्य असण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांना कळविण्यात आली. त्यांनी तातडीने खातरजमा करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस पथक सह्याद्री हॉस्पिटलकडून जीएसटी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचले. तेथील मोकळ्या जागेत दोन तरुण थांबलेले पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे तेथे थांबण्याचे कारण विचारले असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांच्या ताब्यात असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारूच्या सहा बाटल्या सापडल्या. Pune crime
या बाटल्यांबाबत पोलिसांनी विचारणा केली असता दोघांनाही समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे त्यांना पुढील चौकशीसाठी येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सखोल चौकशी केली असता संबंधित विदेशी दारूच्या बाटल्या कल्याणीनगर येथील ‘टॉनिक आऊटलेट’ या दुकानातून चोरल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात या बाटल्या येरवडा पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांना संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेल्या सहा विदेशी दारूच्या बाटल्यांची एकूण किंमत २७ हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. Pune crime
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड, पोलीस हवालदार मुकुंद कोकणे तसेच पोलीस अंमलदार बालाजी सोगे, संदीप जायभाय, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, शैलेश वाबळे, नटराज सुतार आणि सोमनाथ गायकवाड यांनी या कारवाईत सहभाग घेतला. Pune crime




