Fraud Case : मुळशीतील पोलीस पाटलाची ५७ लाखांची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर
2 मिनिट वाचन

Fraud Case : इन्स्टाग्रामवरील शेअर मार्केट जाहिरातीला भुलूले
पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र मिरर
Fraud Case : मुळशी तालुक्यातील आंधळे गावचे पोलीस पाटील सागर ज्ञानेश्वर पापळ (वय ३४) यांची इन्स्टाग्रामवरील शेअर मार्केट गुंतवणुकीच्या जाहिरातीच्या माध्यमातून तब्बल ₹५६,२४,९९९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. Fraud Case online 57 lakh police mulshi
फिर्यादीनुसार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सागर पापळ हे घरी असताना इन्स्टाग्रामवर 'व्हेंचुरा सेक्युरिटी लिमिटेड' या नावाने शेअर मार्केट गुंतवणुकीची जाहिरात पाहिली. अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ८४२२९४२६३५ या क्रमांकावरून त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधण्यात आला. त्यानंतर ६३६४४८५०७३ या क्रमांकावरील स्वतःला "सिया" म्हणवणाऱ्या महिलेने त्यांना "व्हेंचुरा सेक्युरिटीज लिमिटेड क्लब -११३" या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपचा अॅडमिन ९९६३८७०९०५ या क्रमांकाचा होता. Fraud Case

आरोपींनी लिंक पाठवून व्हेंचुरा सेक्युरिटी लिमिटेडचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. अॅपवर खाते तयार करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असा विश्वास निर्माण करण्यात आला. सुरुवातीला कमी रकमेची गुंतवणूक करून अॅपवर नफा दाखवण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आणि एका जी-पे आयडीवर टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.
RMC : पुण्यात वीकेंडला आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेश; कॅमेरा, मद्यतपासणीसह कडक सुरक्षा नियम
27 नोव्हेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत फिर्यादीने विविध बँक खात्यांमध्ये आणि डिजिटल पेमेंटद्वारे एकूण ₹56,24,999 ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर अॅपवर त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून ₹10.90 कोटी झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे आरोपींनी आणखी गुंतवणुकीचे आमिष दाखवले.Fraud Case

मात्र, फिर्यादीने पैसे काढण्याची विनंती केल्यानंतर आरोपींनी ₹३० लाख सिक्युरिटी डिपॉझिट भरल्याशिवाय रक्कम मिळणार नसल्याचे सांगितले. फिर्यादीने गुंतवणुकीतूनच ही रक्कम वजा करून उर्वरित पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र अतिरिक्त ₹३० लाख भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, अशी अट घालून आरोपींनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
MS-CET : बोगस गुण, लाखांचे ‘पॅकेज’ अन्… ; शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा!
या प्रकरणी फिर्यादीने ६, ७ आणि ८ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वरही तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यानंतर पौड पोलीस ठाण्यात "सिया" (मो. 6364485073), 8422942635 वरील व्यक्ती, व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन (मो. 9963870905) तसेच संबंधित बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष दत्तात्रय गिरीगोसावी करत आहेत. Fraud Case
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)




