MS-CET : बोगस गुण, लाखांचे 'पॅकेज' अन्... ; शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा!
MS-CET : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.
2 मिनिट वाचन

MS-CET : बोर्डाच्या परीक्षेत जेमतेम पास होणारे विद्यार्थी आणि सीईटीमध्ये थेट 'शंभर टक्केवारी' गाठणारे टॉपर्स,
MS-CET : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) घेतली जाणारी एमएस-सीईटी (MS-CET) आणि एमबीए-सीईटी (MBA-CET) परीक्षा आता ज्ञानार्जनाचे साधन न राहता, काही लांडग्यांसाठी पैशांच्या वसुलीचा अड्डा बनली आहे. बोर्डाच्या परीक्षेत जेमतेम पास होणारे विद्यार्थी आणि सीईटीमध्ये थेट 'शंभर टक्केवारी' गाठणारे टॉपर्स, यामुळे राज्यातील शिक्षणव्यवस्थेमध्ये पारदर्शकतेचा बोजवारा उडाला आहे. याप्रकरणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. MS-CET scam chandrakant patil maharashtra

बोर्डाचे मार्क ४५% आणि सीईटीत थेट १०० टक्के?
या परीक्षाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाला ४५ टक्के आहेत त्यांना सीईटीमध्ये थेट १०० टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे अनेक पालकांच्या भुवया उंचावल्या आहेत. . ज्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये (विशेषतः फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स अर्थात पीसीएम मध्ये) जेमतेम ४५ टक्के किंवा पासिंगच्या आसपास गुण मिळाले आहेत, त्याच विद्यार्थ्यांना एमएस-सीईटी (MS-CET) आणि एमबीए-सीईटी सारख्या अत्यंत स्पर्धात्मक व उच्च दर्जाच्या परीक्षेत थेट ९९ पेक्षा जास्त किंवा तब्बल १०० पर्सेंटाईल कसे मिळू शकतात? असा सवाल याप्रकरणी उपस्थित होत आहे. अशातच दुसरी बाजू म्हणजे "१५ लाखांत COEP, VJTI कन्फर्म!" - ऑडिओ क्लिपमधून मोठे रॅकेट याप्रकरणी समोर आले आहे. MS-CET
PMC : पुणेकरांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; जाणून घ्या कोणत्या भागात येणार नाही पाणी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्सने या संपूर्ण रॅकेटची पोलखोल केली आहे. संभाजीनगर आणि इतर ठराविक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना बसवून, पेपर सोडवण्यापासून ते थेट प्रवेश मिळवून देण्यापर्यंतचे संपूर्ण 'मॅनेजमेंट' काही ठराविक दलालांकडून केले जात आहे. MS-CET
कोट्यवधींचा बाजार: COEP, VJTI आणि PICT सारख्या नामांकित शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी १३ ते १५ लाख रुपयांपर्यंतची बोली लावली जात आहे. "विद्यार्थ्याने फक्त केंद्रावर येऊन बसायचे, निकाल हातात आल्यावरच पैसे द्या, पण मूळ कागदपत्रे आधीच आमच्याकडे जमा करा," अशी दमदाटी पालकांना केली जात आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये नक्की काय?
फोनवर पालकांशी बोलणारी व्यक्ती किंवा मध्यस्थ असा दावा करतो की, विद्यार्थ्याने फक्त केंद्रावर जाऊन बसायचे, बाकीचा पेपर सोडवणे किंवा गुणांचे मॅनेजमेंट करण्याची जबाबदारी आमची यंत्रणा पार पाडेल. नामांकित सरकारी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालये (जसे की COEP, VJTI, PICT) मिळवून देण्यासाठी १३ ते १५ लाख रुपयांपर्यंतचे बजेट सांगितल्या जात आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत विद्यार्थ्याला हवा तोफा निकाल किंवा प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत पैसे द्यावे लागणार नाहीत. असे सांगण्यात येत आहे. MS-CET
PMC: मंजूर १३ पैकी ८ पदे रिक्त; पुण्याच्या शासकीय बालरुग्णालयांची अवस्था रामभरोसे
गेल्या पाच वर्षापासून …. चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा
२०२१ पासून अशाप्रकारचे रॅकेट सक्रिय असल्याचा दावा विद्यार्थी संघटना आणि नेत्यांकडून केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विरोधकांनी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी राज्य शासनावर व सीईटी सेलवर (CET Cell) प्रश्नांची सरबत्ती केली आहे. "NEET घोटाळ्याप्रमाणेच महाराष्ट्रातही सीईटीच्या माध्यमातून प्रवेशाचा बाजार मांडला गेला आहे का?" असा संतप्त सवाल विचारला जात असून याप्रकरणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले जात असून त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
Pune Police: जखमी तक्रारदारांना आता स्वतः रुग्णालयात नेणार पोलीस
एवढे सगळे गंभीर आरोप, ऑडिओ पुरावे आणि विद्यार्थ्यांची निदर्शने समोर येत असतानाही, संबंधित उच्च व तंत्र शिक्षण विभाग किंवा सीईटी सेलकडून कोणतीही ठोस, पारदर्शक व अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)




