मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : दिवाळीच्या खरेदीसह फुलबाजारातही तेजी; आवक आणि मागणीत वाढ

Pune News :पुणे : दिवाळीच्या सणामुळे बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच मार्केट यार्डातील फुलबाजारही फुलांनी बहरला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

दिवाळीच्या खरेदीसह फुलबाजारातही तेजी; आवक आणि मागणीत वाढ
दिवाळीच्या खरेदीसह फुलबाजारातही तेजी; आवक आणि मागणीत वाढ


Pune News :पुणे :
दिवाळीच्या सणामुळे बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच मार्केट यार्डातील फुलबाजारही फुलांनी बहरला आहे. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी वाढल्याने बाजारात आवक वाढली असून, फुलांच्या दरातही मागील चार दिवसांच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, यंदा पाणीटंचाईचा फुलांच्या उत्पादनावर आणि दर्जावर परिणाम झाला आहे. बाजारात दाखल होणाऱ्या फुलांपैकी केवळ २५ टक्के माल दर्जेदार असल्याने चांगल्या आणि हलक्या दर्जाच्या फुलांच्या दरात मोठी तफावत पाहायला मिळत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

लक्ष्मीपूजन रविवारी (दि. ८) असल्याने शुक्रवारी मार्केट यार्डात फुलांची मोठी आवक झाली. झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असून, लक्ष्मीपूजनासाठी शेवंतीला विशेष महत्त्व असल्याने तिचीही आवक वाढली आहे. याशिवाय गुलछडी आणि अॅस्टर या फुलांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या विविध भागांतून फुले बाजारात दाखल होत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

यंदा गणेशोत्सवाचे पहिले पाच दिवस आणि नवरात्रीचे शेवटचे काही दिवस वगळता फुलांना अपेक्षित मागणी नव्हती. त्यामुळे दर कमी राहिले होते. दिवाळीत चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फुले राखून ठेवली होती. आता हा माल बाजारात येत आहे.

अखिल फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर आणि समन्वयक सागर भोसले यांनी पुढील दोन दिवस फुलांची आवक मोठी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी (दि. १०) दिवाळी पाडव्यालाही फुलांना मागणी राहणार असल्याने बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा