मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Devendra Fadnavis : घराणेशाहीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला

•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रचारार्था सभा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Lok Sabha Election

•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रचारार्था सभा

सोलापूर :- माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेच निवडून येणार आहेत. निंबाळकरांनी मोदी यांच्या आशीर्वादाने दिलेले शब्द पूर्ण केले आहेत. 50 वर्ष ज्यांना नेतृत्व दिले, ते प्रत्येक निवडणुकीत तीच-तीच भाषणं, घोषणा करत होते. मात्र घोषणांची पूर्तता कधीही झाली नाही," अशी टीकाही अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली आहे.

मोहिते-पाटील घराण्याने आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले, खून केले. मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी या माढा तालुक्याला मोहिते-पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. माढा लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा आयोजित करण्यात आली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवत आहेत. यावेळी फडणवीस बोलत होते

घराणेशाहीवरुन शरद पवार, सुशीलकुमार शिंदेंवर निशाणा दरम्यान पुढे फडणवीस म्हणाले, "काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आम्ही 20 वर्षांनी एकत्र आल्याचे सांगितले. आम्ही पुढच्या पिढीच्या भल्यासाठी एकत्र आलो, असे ते लोकांना सांगत होते. पण हे तिघे आपापल्या घरातील पुढच्या पिढीसाठी एकत्र आले आहेत. शरद पवार हे सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे हे प्रणिती शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील हे त्यांच्या घराण्यातील पुढच्या पिढीसाठी एकत्र आले आहेत", अशी टीका फडणवीसांनी केली.

ठोकशाही चालू देणार नाही यावेळी फडणवीस यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात माढ्यात उभ्या असणाऱ्यांचा इतिहास बघा. या तालुक्याला मी त्यांच्या दहशतीपासून मुक्त करणार आहे. त्यांनी आजवर अनेक लोकांचे खून केले, अनेकांच्या जमिनी बळकावल्या गेल्या, कित्येक जणांवर हल्ले झाले. मात्र, आता हे हल्ले सहन केले जाणार नाहीत. ही लोकशाही आहे. त्यामुळे इकडे ही ठोकशाही चालू देणार नाही", असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा: Patanjali's Misleading Advertisement Case : पतंजलीची दिशाभूल करणारी जाहिरात प्रकरण : वेळेवर माफी का दाखल झाली नाही? सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना प्रश्न विचारले आहेत

शेअर करा