मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Cyber Fraud म्युल अकाउंट प्रकरणातील 'मोठा मासा' पोलिसांच्या गळाला

Cyber Fraud : देशभरातील नागरिकांना इनव्हेस्टमेंट फ्रॉड आणि ऑनलाइन टास्कच्या जाळ्यात ओढून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य 'म्युल अकाउंट' पुरवठादार आरोपीला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

M
mubarak

2 मिनिट वाचन

Cyber Fraud

Cyber Fraud : १५० कोटींच्या सायबर फ्रॉडचा आळंदी पोलिसांकडून पर्दाफाश

Cyber Fraud : देशभरातील नागरिकांना इनव्हेस्टमेंट फ्रॉड आणि ऑनलाइन टास्कच्या जाळ्यात ओढून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य 'म्युल अकाउंट' पुरवठादार आरोपीला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीच्या नऊ बँक खात्यांमध्ये सायबर गुन्ह्यांतील १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयित व्यवहार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. Cyber Fraud

सचिन संजय काळे (वय २५, रा. मोशी) असे आळंदी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Cyber Fraud

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने ही धडक कारवाई केली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी येथील गोडाऊन चौकाजवळून सचिन काळे याला ताब्यात घेण्यात आले. कॉसमॉस बँक आळंदी शाखेतील बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी केला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

PMC : महामेट्रोचा पुणे मनपाला लाखोंचा चुना? परवानगीशिवाय मेट्रो डब्यांवर जाहिराती

आरोपीने स्वतःच्या नावे वेगवेगळ्या ९ बँकांमध्ये खाती उघडली होती. या खात्यांचा ताबा सायबर गुन्हेगारांना देऊन त्या बदल्यात मोठे कमिशन तो मिळवत होता. या खात्यांवर आलेली रक्कम तो एटीएम आणि चेकद्वारे काढून थेट टोळीला पुरवत असे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वरील माहितीनुसार, या रॅकेटद्वारे देशातील ६५ नागरिकांची १५० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, फौजदार तुकाराम खडके, हवालदार आरती निकम, जगताप, सोळंके आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.Cyber Fraud
───
म्युल अकाउंट म्हणजे काय ? 

सायबर भामटे फसवणुकीची रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता भुलथापा देऊन किंवा कमिशन देऊन इतर व्यक्तींची खाती वापरतात.  अशा खात्यांना म्युल  अकाउंट म्हणतात. Cyber Fraud



आकडेवारी एका नजरेत….

  • एकूण फसवणूक : १५० कोटी रुपये    
  • बाधित नागरिक : ६५ जण (देशभरात)  
  • आळंदी पोलिसांनी पकडलेला आरोपी - सचिन काळे (वय २५ वर्षे)
  • आरोपीने उघडलेली बँक खाती - ९ बँकांमध्ये
  • स्वीकारलेली रक्कम : १ कोटी १५ लाख
  • दाखल गुन्हे - २

  • सायबर गुन्हेगार आर्थिक आमिष दाखवून नागरिकांची बँक खाती आणि सिमकार्ड भाड्याने किंवा वापरासाठी घेतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते किंवा एटीएम वापरू देऊ नका. अनोळखी स्त्रोताकडून आलेले पैसे ऑनलाइन स्वीकारून ते रोख स्वरूपात काढून देणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. - मारुती जगताप, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-३, पिंपरी-चिंचवड Cyber Fraud
  • PMC: पुणे महानगरपालिकेच्या पार्किंग कंत्राटदारांकडे ८६.७ लाखांची थकबाकी चव्हाट्यावर!
  • View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

    शेअर करा