Cyber Fraud म्युल अकाउंट प्रकरणातील 'मोठा मासा' पोलिसांच्या गळाला
Cyber Fraud : देशभरातील नागरिकांना इनव्हेस्टमेंट फ्रॉड आणि ऑनलाइन टास्कच्या जाळ्यात ओढून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य 'म्युल अकाउंट' पुरवठादार आरोपीला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
2 મિનિટ વાંચન

Cyber Fraud : १५० कोटींच्या सायबर फ्रॉडचा आळंदी पोलिसांकडून पर्दाफाश
Cyber Fraud : देशभरातील नागरिकांना इनव्हेस्टमेंट फ्रॉड आणि ऑनलाइन टास्कच्या जाळ्यात ओढून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य 'म्युल अकाउंट' पुरवठादार आरोपीला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीच्या नऊ बँक खात्यांमध्ये सायबर गुन्ह्यांतील १ कोटी १५ लाख रुपयांचे संशयित व्यवहार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. Cyber Fraud
सचिन संजय काळे (वय २५, रा. मोशी) असे आळंदी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने ही धडक कारवाई केली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी येथील गोडाऊन चौकाजवळून सचिन काळे याला ताब्यात घेण्यात आले. कॉसमॉस बँक आळंदी शाखेतील बचत खात्याचा वापर ऑनलाइन फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी केला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
PMC : महामेट्रोचा पुणे मनपाला लाखोंचा चुना? परवानगीशिवाय मेट्रो डब्यांवर जाहिराती
आरोपीने स्वतःच्या नावे वेगवेगळ्या ९ बँकांमध्ये खाती उघडली होती. या खात्यांचा ताबा सायबर गुन्हेगारांना देऊन त्या बदल्यात मोठे कमिशन तो मिळवत होता. या खात्यांवर आलेली रक्कम तो एटीएम आणि चेकद्वारे काढून थेट टोळीला पुरवत असे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वरील माहितीनुसार, या रॅकेटद्वारे देशातील ६५ नागरिकांची १५० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, फौजदार तुकाराम खडके, हवालदार आरती निकम, जगताप, सोळंके आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.Cyber Fraud
───
म्युल अकाउंट म्हणजे काय ?
सायबर भामटे फसवणुकीची रक्कम थेट स्वतःच्या खात्यात न घेता भुलथापा देऊन किंवा कमिशन देऊन इतर व्यक्तींची खाती वापरतात. अशा खात्यांना म्युल अकाउंट म्हणतात. Cyber Fraud

आकडेवारी एका नजरेत….
सायबर गुन्हेगार आर्थिक आमिष दाखवून नागरिकांची बँक खाती आणि सिमकार्ड भाड्याने किंवा वापरासाठी घेतात. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते किंवा एटीएम वापरू देऊ नका. अनोळखी स्त्रोताकडून आलेले पैसे ऑनलाइन स्वीकारून ते रोख स्वरूपात काढून देणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो. नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. - मारुती जगताप, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-३, पिंपरी-चिंचवड Cyber Fraud
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
