मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
भाजपकडून संघटन विस्ताराची रणनीती; ‘सेवादूत अभियाना’च्या प्रभावी अंमलबजावणीवर भररोहित पवारांना बावनकुळेंचा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांवरून राजकीय वातावरण तापलेप्रत्येक जिल्ह्यात १००, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृहे उभारणार; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहितीदुष्काळग्रस्त लोककलावंतांच्या मदतीसाठी ‘अर्बन तमाशा’; २२ नोव्हेंबरला कोथरूडमध्ये रंगणार लोककलेचा अनोखा आविष्कारपालघरमध्ये माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेशडीसीपींना फोन का केला?' म्हणत व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक

बार्शीतील वृंदावन साखर कारखाना शेतकऱ्यांनी पाडला बंद

ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; गव्हाणीत उतरून आंदोलन, ट्रॅक्टरची हवाही सोडली

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

1 मिनिट वाचन

साखर कारखाना

सोलापूर : ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची धार तीव्र केली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वृंदावन साखर कारखाना शेतकरी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. कार्यकर्त्यांनी थेट उसाच्या गव्हाणीत उतरून गाळप प्रक्रिया रोखली.

सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी संघटनेची मागणी आहे. मात्र, कारखानदार प्रतिटन ३ हजार १५० रुपयांच्या दरावर ठाम असल्याने दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे.

दरम्यान, ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कारखाने सुरू ठेवू नयेत, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. वृंदावन कारखान्यात आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरच्या चाकांमधील हवाही सोडून दिली. ऊसदराचा निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात ऊसदर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर