मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
प्रत्येक जिल्ह्यात १००, तर विभागीय स्तरावर २५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची वसतिगृहे उभारणार; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहितीदुष्काळग्रस्त लोककलावंतांच्या मदतीसाठी ‘अर्बन तमाशा’; २२ नोव्हेंबरला कोथरूडमध्ये रंगणार लोककलेचा अनोखा आविष्कारपालघरमध्ये माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेशडीसीपींना फोन का केला?' म्हणत व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाकपिंपरी-चिंचवडने कर्जाचे पाणी पिण्याचा मार्ग स्वीकारलाअजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर;कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फलक

पालघरमध्ये माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेश

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; दोन वर्षांच्या राजकीय अलिप्ततेनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पालघरमध्ये माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेश
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; दोन वर्षांच्या राजकीय अलिप्ततेनंतर पुन्हा सक्रिय राजकारणात

पालघर, महाराष्ट्र मिरर : पालघर जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात भाजपची राजकीय ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पालघर दौऱ्यावर आले होते. याच कार्यक्रमादरम्यान श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या घडामोडीकडे पालघर जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

उमेदवारी नाकारल्यानंतर राजकारणापासून होते अलिप्त

श्रीनिवास वनगा यांच्या भाजप प्रवेशामागे गेल्या काही वर्षांतील राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी आहे. २०१८ मध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पालघर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

पुढे शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर ते काही काळ सक्रिय राजकारणापासून दूर होते. आता जवळपास दोन वर्षांनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पुन्हा राजकीय मैदानात पुनरागमन केले आहे.

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र

श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण नवशा वनगा यांचे पुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबाचा पालघर जिल्ह्यातील राजकारणात प्रभाव राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला केवळ पक्षांतर म्हणून नव्हे, तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवणारी घटना म्हणूनही पाहिले जात आहे.

दरम्यान, श्रीनिवास वनगा यांच्या या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटालाही राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील पक्षीय संघटन आणि आगामी राजकीय रणनीतीवर काय परिणाम होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper