मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यास भारताचा विरोधलातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का; धीरज देशमुखांच्या सहकार पॅनलची बाजीसूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा

तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे आक्रमक; ‘सह्याद्रीवर प्रकल्प लादाल तर इतिहास लक्षात ठेवा’

पर्यावरणाची हानी करणारे २३ प्रकल्प हद्दपार करण्याचा निर्धार; अदानी कंपनी आणि सरकारवर गंभीर आरोप

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

सयाजी शिंदे
सयाजी शिंदे

सातारा, महाराष्ट्र मिरर : पाटण तालुक्यातील तारळी धरण परिसरात अदानी ग्रीन एनर्जीच्या वतीने सुरू असलेल्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात आता अभिनेते सयाजी शिंदे आणि विवेकानंद पाटील आक्रमक झाले आहेत. रविवारी त्यांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. मोठ्या प्रमाणात सुरू असलेले उत्खनन आणि वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या खर्चातील कथित तफावत आणि पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. यावेळी जाहीर सभेत बोलताना, सह्याद्रीच्या डोंगररांगांवर पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा सयाजी शिंदे यांनी दिला. याच सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला होता, हा इतिहास सरकारने लक्षात ठेवावा, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प राज्याच्या माथी मारले जात असून, फायद्याचे मोठे प्रकल्प गुजरातला दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. सह्याद्रीच्या परिसरात तारळी पंप स्टोरेजसारखे आणखी २३ प्रकल्प प्रस्तावित आहेत. हे सर्व प्रकल्प हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, तारळी प्रकल्पाची मूळ किंमत ५ हजार ६७५ कोटी रुपये असताना वन्यजीव संवर्धन निधी वाचविण्यासाठी ती केवळ ५६.७५ कोटी रुपये दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी नसताना सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी केला. वृक्षतोड, उत्खनन आणि पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाविरोधात रविवारी रात्री तारळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर