Skip to content

बार्शीतील वृंदावन साखर कारखाना शेतकऱ्यांनी पाडला बंद

ऊसदराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; गव्हाणीत उतरून आंदोलन, ट्रॅक्टरची हवाही सोडली

Smita Kulkarni
Smita Kulkarni

1 min read

साखर कारखाना

सोलापूर : ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची धार तीव्र केली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील वृंदावन साखर कारखाना शेतकरी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. कार्यकर्त्यांनी थेट उसाच्या गव्हाणीत उतरून गाळप प्रक्रिया रोखली.

सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी संघटनेची मागणी आहे. मात्र, कारखानदार प्रतिटन ३ हजार १५० रुपयांच्या दरावर ठाम असल्याने दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे.

दरम्यान, ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कारखाने सुरू ठेवू नयेत, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. वृंदावन कारखान्यात आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरच्या चाकांमधील हवाही सोडून दिली. ऊसदराचा निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात ऊसदर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror